डॉ.विश्वेश्वरेया याना वाहिली आदरांजली
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
15 सप्टेंबर हा दिवस भारतरत्न सर डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून मोठ्या थाटात भारत देशात साजरा केला जातो. याच अभियंता दिनाचे अवचित्य साधून महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ अमरावती राज्य अभियंता संघटना अमरावती व महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशन अमरावती जिल्हा या संघटनेने अभियंता दिन 2025 म्हणजेच एक सामाजिक बांधिलकी जपत अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यातील विद्यार्थी ज्यांना शिकण्याची आवड जिद्द आहे असे गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप चा तसेच वृक्ष लागवडीचा सामाजिक कार्यक्रम 16 सप्टेंबर 2025 ला संपन्न झाला असून कार्यक्रमाला मोठ्या संख्येने अभियंते, कंत्राटदार अभियंते अधिकारी उपस्थित होते वरील संघटना या अभियंता कंत्राटदारांच्या हक्कासाठी न्यायासाठी सतत लढत असतात दरवर्षी काही ना काही सामाजिक उपक्रम घेऊन समाजकारणाचे धोरण राबवून अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अभियंताची फौज निर्माण केली आहे.

अशाच सामाजिक उपक्रमामुळे अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये सर्व कंत्राटदारांना एक करून मोठ्या प्रमाणावर एक संघटनेची बांधिलकी केल्याची दिसून आले त्याचाच त्याचाच प्रत्यय आज येथे झालेल्या सामाजिक बांधिलकीच्या कार्यक्रमात दिसून आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अल्केश ढोलवाडे SVAR Quality Consultant चे संचालक, श्रीजीत पाटील जनरल मॅनेजर सुंदर नारायण कन्स्ट्रक्शन कंपनी, अभिनव भार्गव भार्गव कन्स्ट्रक्शन कंपनी, माननीय प्रतीक गिरी साहेब कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती, माननीय अभियंता श्री अनिल भटकर साहेब उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती आणि मोठ्या संख्येने उपविभागीय अभियंता, कनिष्ठ अभियंता, अभियंता कंत्राटदार आणि इतर कंत्राटदार बंधू उपस्थित होते. वरील सामाजिक बांधिलकीच्या कार्यक्रमाकरिता सर्व अभियंतांनी खूप मेहनत घेतली त्यामध्ये संघटनेचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष अश्विन पवार , उज्वल पांडे, शुभम गिरी, राहुल संडे, प्रशांत बाजड, शिवचरण राठोड ,अर्जुन खडसे, वैभव गावंडे, गजानन दळवी सह असंख्य कंत्राटदार बंधू उपस्थित होते.
