अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियान” सुरू करण्यात आले असून, हे एक राज्यव्यापी विशेष आरोग्य अभियान आहे. हे अभियान केवळ मोफत नेत्रतपासणी पुरते मर्यादित नसून, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चष्मे वितरण आणि इतर नेत्ररोगांवरील उपचार अशी सर्वसमावेशक सेवा नागरिकांना मोफत पुरवण्यात येत आहे.या अभियानामध्ये धर्मादाय आयुक्त मा. अमोघ कलोती (महाराष्ट्र राज्य, मुंबई) तसेच धर्मादाय सह आयुक्त, अमरावती श्री. दीपक खोचे यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.अमरावती जिल्ह्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अंतर्गत कार्यरत सहा धर्मादाय रुग्णालयांनी गावपातळीवर व दुर्गम भागांमध्ये नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांना संलग्न वैद्यकीय रुग्णालयात पाठवून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. गरजू, गोरगरीब, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला व मजूर वर्गासाठी ही मोहीम मोठा दिलासा ठरत आहे, अशी प्रतिक्रिया धर्मादाय सह आयुक्त श्री. दीपक खोचे यांनी दिली.
आजअखेरची आकडेवारी (अमरावती विभाग)
शिबिरे आयोजित: ३०,एकूण लाभार्थी: १,०९७,शस्त्रक्रिया पूर्ण: ३२,चष्मे वाटप: ५१६

सदर माहिती सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री. राजेश इंगोले यांनी प्रसिद्ध केली आहे.
मोहिमेचे स्वरूप व सुविधा,मोफत नेत्र तपासणी शिबिरे
मोफत मोतीबिंदू व इतर नेत्ररोग शस्त्रक्रिया शस्त्रक्रियेनंतर मोफत घरपोच चष्मे ग्लॉकोमा (काचबिंदू), रेटिनाशी संबंधित समस्या, दृष्टिदोष यांची तपासणी व मार्गदर्शन
मोहिमेचा कालावधी
१७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे.
उपलब्ध धर्मादाय रुग्णालये व तपासणी वेळा (अमरावती जिल्हा)
रुग्णालयाचे नाव पत्ता तपासणी वेळ
1. डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालय व अनुसंधान केंद्र मोर्शी रोड, अमरावती सकाळी ८ ते दुपारी २
2. विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय दस्तुर नगर, अमरावती सकाळी ९ ते दुपारी २
3. श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय गुरुकुंज मोझरी सकाळी ९ ते दुपारी १२
4 . महाराज रुपभजन चॅरिटेबल हॉस्पिटल (ओपीडी) राजापेठ, अमरावती सकाळी १० ते २, संध्या ६ ते ९
5 . डॉ. राजेंद्र गोडे आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड कॉलेज मार्डी रोड, अमरावती सकाळी ९ ते दुपारी २
6 . श्री राणी आय हॉस्पिटल चित्रा टॉकीज जवळ, अमरावती सकाळी ८ ते ११, संध्या ४ ते ७ या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी जनतेने नजीकच्या धर्मादाय रुग्णालयाशी संपर्क साधावा व मोफत सेवा घेऊन आपल्या डोळ्यांचे आरोग्य जपावे,असे आवाहन धर्मादाय विभाग,अमरावती यांनी केले आहे.
