
पथकाकडून आणखी 9 ग्राम एमडी जप्त.
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
दिनांक 20 जुलै 2025 रोजी अमरावती गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने आरोपी अतीक बेग अनिस बेग रा.तालाबपुरा अमरावती व मोहम्मद रिजवान अब्दुल गणी रा.अकबर नगर अमरावती यांच्या ताब्यातून सुमारे 110 ग्राम एमडी जप्त केली होती.
सदर आरोपींनी इसम नामे सय्यद जमीर उर्फ मुज्जु सय्यद नूर वय 22 वर्ष रा.तालाबपुरा याचे कडून सदरची MD खरेदी केल्याचे सांगितल्याने आज दिनांक 23.07.2025 रोजी 16.30 वाजता सय्यद जमीर यास welcome पॉईंट येथून ताब्यात घेतले असता त्याचे ताब्यातुन 8.86 ग्राम MD हस्तगत झाली आहे.
Now Amrawati people…
SAY NO TO DRUGS
.पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे व मा.पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, मा.पोलीस उपायुक्त श्याम घुगे,मा.पोलीस उपायुक्त (गुन्हे) रमेश धुमाळ तसेच सपोआ (गुन्हे) शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनात अमरावती शहरात MD येते कुठून व त्याचे सेवन कोण कोण करते याच्या मुळापर्यंत गुन्हे शाखा युनिट 2 जाणार.
सर्व अमरावतीकरांना आवाहन आहे की, आपल्या आजूबाजूला कोणी गांजा,एमडी किंवा इतर Drugs ची विक्री अथवा सेवन करीत असल्यास तात्काळ गुन्हे शाखेच्या किंवा स्थानिक पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.