अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे पुन्हा एकदा येथील तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य अधोरेखित झाले आहे. सदर रुग्ण वलगाव येथील असून ३० वर्षीय महिला आहे ,ती तीव्र पोटदुखीच्या तक्रारीसह विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे तपासणी साठी आली असता तिच्या प्राथमिक तपासण्या आणि सीटी स्कॅन करण्यात आले त्यामध्ये २५ x २० x १५ से.मी. आकाराची मोठी अंडाशयाची गाठ आढळली. त्यासाठी तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते तेव्हा रुग्णालयातील कॅन्सर तज्ञ डॉ.आयुष हेडा यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढ यांच्याशी चर्चा करून सदर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली तर त्या महिलेचे प्राण वाचविले. त्या रुग्णाची गाठ ही मूत्रवाहिनी (युरेटर), मूत्राशय व ओमेंटमला चिकटलेली असल्याने शस्त्रक्रिया अतिशय अवघड होती. मात्र अत्यंत बारकाईने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे गाठ कोणत्याही गुंतागुंतीशिवाय यशस्वीरित्या काढण्यात आली. रुग्ण उत्तम प्रकारे बरी होत असून लवकरच पूर्णपणे बरी होईल अशी अपेक्षा आहे.त्याचप्रमाणे यापूर्वीच्या आठवड्यातच आणखी एक दुर्मिळ प्रकारची शस्त्रक्रिया या रुग्णालयात करण्यात आली. सदर रुग्ण धारनि येथील असुन २७ वर्षीय महिला होती , या महिलेच्या पोटात ३० x ३२ x २० से.मी. इतक्या मोठ्या आकाराच्या गाठीसह दाखल झाली होती. तेव्हा त्या महिलेच्या पुर्व तपासण्या करण्यात आल्या त्यामध्ये सदर रुग्ण ला रक्त कमी असल्यामुळे तिला प्रथम रक्त देऊन रुग्णास स्थिर केल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेच्या वेळी ही गाठ चौथ्या टप्प्यातील कर्करोग असल्याचे निदर्शनास आले, तरीही संपूर्ण गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली व त्या महिलेचे प्राण वाचविले. रुग्णालयातील उत्कृष्ट उपचारांमुळे रुग्ण पूर्णपणे बरी झाली असून तिला यशस्वीरीत्या डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता तिच्यावर विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथे पुढील केमोथेरपी उपचार केले जाणार आहेत.सदर शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत विधामूल्य करण्यात आली.अशा गुंतागुंतीच्या कर्करोग शस्त्रक्रिया व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नारोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया ऑन्कोसर्जन डॉ.आयुष हेडा , डॉ.अतुल यादगिरे, बधिरीकरन डॉ. सपना अग्रवाल,ऑन्कोलॉजी नोडल ऑफिसर डॉ. रोहिणी राठोड , माधुरी गाडेकर,डॉ. किरण पारीसे, डॉ. ऐश्वर्या, डॉ. साक्षी सपकाळ, मेट्रण चंदा खोडके, माला सुरपाम यांच्या सूचनेनुसार इन्चार्ज सिस्टर बिल्कीस शेख, जया वाघमारे, वंदना जाधव, कोमल खाडे, करण सदर, पायल अंभोरे, ज्योत्स्ना मुंदाणे, शंकर झटाले, सागर गणोरकर, लक्ष्मी सोनवणे, सचिन शेरे, आदींचे शस्त्रक्रियेत मोलाचे सहकार्य होते.
