नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे अमरावती ग्रामीण उपाध्यक्ष अमोल हिरोडे यांनी वाटपूर येथील मराठी आणि उर्दू शाळेत सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले.भास्कर भोपसे यांचे कोरोना काळात निधन झालं परंतु त्यांचा वाढदिवसाच्या निम्मित दरवर्षी काही तरी आपल्या मित्राच्या स्मृतीला उजाळा देण्याचं काम अमोल हिरोडे करत असतात.यावेळी बॅगच वितरण केल्या मुळे सर्व शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर खुप आंनद पाहण्यास मिळाला.कार्यक्रमाला सरपंच शिवदास हिरोडे, उपसरपंच प्रमेश्वर बनसोड,मुज्जू चौऊस, सचिव बर्डीये,रब्बू चाऊस,सुभाष पाटील जितू पोटपिटे प्रदीप कोकाटे अमोल लळे, तेलमोरे सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक चोरपगार सर व सर्व शिक्षकवृंद व गावकरी मंडळी उपस्थित होते.या कार्याच सर्वत्र कौतुक होत आहे.

