
ग्राहक हित सर्वोपरी -नितीन काकडे
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ही संघटना शोषण मुक्त ग्राहक हे स्वप्न उराशी बाळगत गेली पन्नास वर्षे सक्रिय आहे असे प्रतिपादन पश्चिम क्षेत्र संघटक नितीनजी काकडे यांनी व्यक्त केले.
विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉक्टर नारायणजी मेहरे यांनी ग्रामीण क्षेत्रातील ग्राहकांचे प्रश्न महत्वाचे असून त्याकडे विशेष लक्ष देण्यावर भर दिला.विदर्भ प्रांत संघटक अभयजी खेडकर यांनी संघटना बांधणीची सूत्रे समजावून सांगितली तर विदर्भ प्रांत सचिव चारुदत्त चौधरी यांनी पर्यावरण रक्षण हा विषय स्पष्ट केला. विदर्भ प्रांत मार्गदर्शक प्रमुख – प्रा अजयजी गाडे यांनी ग्राहक कायद्या विषय व इतर महत्व पुर्ण मार्गदर्शन केले तसेच डॉ. नारायणजी मेहरे यांनी याप्रसंगी पुढील प्रमाणे अमरावती जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली व सर्वांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्यात.
जिल्हा कार्यकारिणी खालील प्रमाणे आहे
१)अध्यक्ष – अशोक हांडे –
२)उपाध्यक्ष – ज्ञानेश्वर टाले
सौ. आशाताई दाभाडे
४ )सचिव – डॉ. चंदनसिंह राजपुत
6 )सहसचिव – अनिल वानखडे, बबनराव आवारे
7 )कोषाध्यक्ष – विश्वास खुमकर
8 )सह कोषाध्यक्ष. मधुकर भोपाळे
9) ‘ ‘ – गजेंद्रजी पाथरे
10 महिला प्रमुख डॉ.सौ. मेघाताई ठाकरे.
11 ) ग्राहक मार्गदर्शक – भगवान पाटील
12 )प्रचार, प्रसिद्धी प्रमुख – प्रकाश पोकळे
13 )विधी आयाम – ॲड मंगेशजी तिडके
14) रोजगार सृजन – आनंदजी महाजन
15 ) पर्यावरण प्रमुख – नंदकिशोर गांधी
16) आय टी सेल प्रमुख – अक्षय धानोरकर
17) सदस्य – विलास कडू
18 ) प्रा. गजेंद्रसिंह पचलोरे
19 ) प्रकाश कुटाफळे
20 ) अजय केने
21 ) ज्ञानेश्वर पुनासे
२२) सुनिल चौंथमल
23 ) प्रभाताई आवारे
24 ) सौ. स्मिता काळबांडे
सर्व पदाधिकाऱ्यांना वरिष्ठाकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले..जिल्हा अध्यक्ष अशोकजी हांडे आणि महानगर अध्यक्ष प्रदीप सगणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.चारुदत्त चौधरी यांनी कल्याण मंत्र म्हटला आणि सुप्रसिद्ध कवयित्री छायाताई पाथरे यांनी ग्राहक गीत सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रपती पुरस्कार विजेता डॉ. शोभाताई गायकवाड यांनी केले तर आभारप्रदर्शन सचिव डॉ.चंदनसिंह राजपूत यांनी केले.