
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाची मागणी
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अमरावती जिल्हा कमिटीच्या वतीने शिक्षण उपसंचालक अमरावती यांना शुक्रवार रोजी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले की यंदा राज्यात पहिल्यांदाच राबवल्या जाणाऱ्या अकरावीच्या केंद्रीभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सोमवारी पार पडली. आता दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागा होत असताना विद्यार्थी व पालकांना मोठ्या अडचणी येत आहे. उदा. पहिल्या फेरीत प्रथम प्राधान्य क्रम दिलेले महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणारे विद्यार्थी नियमानुसार पुढील दोन फेऱ्यासाठी प्रवेश प्रक्रिये बाहेर फेकले गेले आहे. पहिल्या प्राधान्याचे महाविद्यालय झालेल्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांनी विविध कारणामुळे प्रवेश नाकारला असल्याचे निदर्शनात येत आहे. विद्यार्थी व पालक ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सावळा गोंधळामुळे चिंतेत आहे अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अडचणी दूर करा . सुलभ व सोप्या पद्धतीने अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश त्वरित मिळून द्या. तसेच निवेदनातून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. निवेदन देतेवेळी, जिल्हाध्यक्ष चैतन्य राज साळवन, आदित्य शिंदे, माजी राज्य कमिटी सदस्य राजगुरू शिंदे उपस्थित होते. निवेदनावर सविता हळदे, यादव हळदे, सुशांत शामसुंदर., साक्षी श्यामसुंदर, सौरभ मारोडकर, संकेत मते, ऋषिकेश मारोटकर यांच्या सहानिशी निवेदन देण्यात आले .