
लोहारा येथील मन नदीच्या पुलावरून पाणीच पाणी.
अकोला / पूर्णाजी खोडके
अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याला जोडणारा शेगाव जवळील मन नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बाधित झाला आहे.या मार्गावर फुलाचे काम सुरू असून पर्यायी रस्ता देण्यात आला आहे.
मात्र पाण्याची पातळी वाढल्याने आता या रस्त्यावरूनही पाणी वाहत आहे त्यामुळे या मार्गे अकोला बुलढाणा जिल्ह्याचा संपर्क सध्या तुटला आहे.मागील आठ दिवसांपासून परिसरामध्ये पावसाने दडी मारली होती दरम्यान आज सकाळपासून या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी नाले एक झाले आहे.
शेगाव – लोहारा दरम्यान असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहेय.. तर नागरिकांनी पूल ओलांडण्याचा धाडस करू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.