
नांदगाव खंडेश्वर नूतन नगर कार्यकारणी घोषणा
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
राष्ट्रीय विद्यार्थी दिवस तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व नांदगाव खंडेश्वर नगरची नूतन नगर कार्यकारणी घोषित करण्यात आली. युनिटी सायन्स अकॅडमी बुधवारा चौक नांदगाव खंडेश्वर येथे हा कार्यक्रम पार पाडला.कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने अमरावती विभाग संयोजक वृषभ गोहणे, अमरावती जिल्हा संयोजक श्रवण देशपांडे, युनिटी सायन्स अकॅडमी सहसंचालक पवन कोटेच्या सर आणि नूतन नगर मंत्री ओम मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा संयोजक श्रवण देशपांडे यांनी तिवसा नगराची नूतन नगर कार्यकारणीची घोषणा केली यावेळेस नगर मंत्री म्हणून ओम मोरे, नगरसहमंत्री प्रेम शिंदे, नगरसहमंत्री रुद्रेश राऊत व इतर कार्यकर्त्यांची घोषणा करण्यात आली.अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा मोठ्या प्रमाणात “व्यक्ती निर्माणातून राष्ट्रनिर्माण” यावर विश्वास ठेवून कार्य करत असते. त्यात अनेक सामाजिक उपक्रम कार्यक्रम विद्यार्थी परिषदे द्वारे चालवले जातात ९ जुलै राष्ट्रीय विद्यार्थी दिवस च्या निमित्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दरवर्षी गुणवंत विद्यार्थी सत्कार हा कार्यक्रम राबवत असते. समाजातील असंख्य गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेला ,त्यांच्या मेहनतीला कुठेतरी प्रोत्साहन प्राप्त व्हावं आणि त्यांच्या या यशाला कुठेतरी व्यासपीठ मिळावं म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा राबवित असते. या वर्षी देखील हा सोहळा 06 जुलै ला नांदगाव खंडेश्वर येथे राबवण्यात आला , पवन कोटेच्या सर यांच्या हस्ते तिवसा नगरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच पवन कोटेच्या सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हि शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटन आहे. शैक्षणिक क्षेत्रात गुणात्मक दर्जा वाढावा तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मंच प्राप्त होऊन राष्ट्र पुनर्निर्माणात त्यांचे योगदान वाढावे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनामध्ये अनेक अशा अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्याचे काम ही संघटना करते. या उद्देशाने विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन अ.भा.वि.प. तर्फे करण्यात येत असते.या कार्यक्रमांमध्ये नांदगाव खंडेश्वर मधील गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक नगरातील नागरिक उपस्थित होते.