
नांदगाव खंडेश्वर/प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अमरावती जिल्हा तर्फे आयोजित तीन दिवसीय जिल्हा अभ्यास वर्ग दिनांक 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट 2025 या कालावधीत नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य गुरुकुल स्कूल येथे उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमधून आलेल्या ७३ कार्यकर्त्यांनी अभ्यास वर्गात सक्रिय सहभाग नोंदविला. जिल्हा अभ्यास वर्ग व प्रदर्शनी उद्घाटन अभाविप विदर्भ प्रांत खेलो भारत प्रमुख डॉक्टर अनिकेत आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी अमरावती विभाग संघटन मंत्री योगेश शेळके, जिल्हा संयोजक श्रवण देशपांडे व इतर कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते. या अभ्यास वर्गात अभाविप परिचय, संघटनात्मक भूमिका आयाम कार्य, कॅम्पस ऍक्टिव्हिजन घोषणा आणि गीत प्रशिक्षण, गेट मीटिंग तसेच विद्यार्थ्यांच्या समस्यावर चर्चा यासारख्या विविध विषयावर प्रत्यक्ष व संवादात्मक सत्रे आयोजित करण्यात आली. कार्यशाळा स्वरूपातील प्रशिक्षणामुळे सहभागी कार्यकर्तांमध्ये नेतृत्व गुण, संघटन कौशल्य व सामाजिक जाणीव विकसित झाली. तीन ऑगस्ट रोजी एकलव्य गुरुकुल स्कूलचे संस्थापक श्री सदानंद जाधव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत या विद्यालयाची स्थापना ध्येयधोरण आणि धनुर्विद्या व राष्ट्रनिष्ठा शिक्षणाची अनोखी परंपरा यांची माहिती दिली. श्रीकांत पर्बत यांनी प्राध्यापक यशवंतराव केळकर यांच्या वरील प्रेरणादायीक वाक्यात घेतले ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रहित व मूल्यदिष्टनेतृत्वाची जाणीव जागृत झाली. यावेळी उपस्थित मान्यवर प्रांत खेलो भारत प्रमुख डॉक्टर अनिकेत आंबेकर, विभाग संघटन मंत्री योगेश जी शेळके, अमरावती जिल्हाप्रमुख प्राध्यापक अभिजीत दोड सर, धामणगाव नगर विस्तारक अर्पित जी तिवारी, विभाग संयोजक ऋषभ गोहने, अभ्यास वर्ग प्रमुख व जिल्हा संयोजक श्रवण देशपांडे, व्यवस्था प्रमुख नांदगाव खंडेश्वर नगर मंत्री उपस्थित होते. या अभ्यास वर्गाचा समारोप वंदे मातरम ने झाला, विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी वातावरणात आगामी काळात अभावी पचा देण्यासाठी समर्पितपणे कार्य करण्याचा संकल्प केला. अभ्यास वर्ग केवळ प्रशिक्षण नव्हे तर विचार, मूल्य, नेतृत्व आणि राष्ट्रीय कार्याची पायाभरणी करण्याचा उपक्रम ठरला. अशी प्रतिक्रिया सहभागी कार्यकर्त्यांनी दिली.