
चोरीच्या टाटा सफारी गाडीने अफूची करीत होते तस्करी
स्थानिक गुन्हे शाखेतील एनडीपीएस पथक व जवाहरनगर पोलीसांची कारवाई
भंडारा / प्रविण भोंदे
भंडारा तालुक्यातील शहापूर येथे स्थानिक गुन्हे शाखा पथक व भंडारा पोलिसमार्फत शहापूरच्या एस आर ग्रँड हॉटेलमध्ये थांबलेला टाटा सफारी वाहनां वर कारवाई केली. सदर वाहनाची झडती घेतली असता चोरीच्या टाटा सफारी वाहनांमधून अफूची तस्करी केल्याची बाब पुढे आली आहे.
पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून नशेकरीता वापरातयेणारे 307 किलो अफूचे टरफल जप्त करण्यात आले आहे . पोलिसांनी केलेल्या कारवाईत 82,51,710 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला शहापूर येथील एस आर ग्रँड हॉटेलमध्ये थांबलेल्या दोन युवकांकडून नशे करिता वापरात येणारे अफू ची टरफल 307 किलो वजनाचे होते सदर व्यक्ती राजस्थान वरून नागपूर दिशेने भंडाऱ्याकडे आले होते. नशेडी अमली पदार्थ तस्करी होत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखा पथक व जवाहर नगर पोलिसांना गोपनीय माहिती मिळताच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आरोपी दिलीप गंगाराम बिश्नोई (24)जयप्रकाश सहीराम बिश्नोई (25) रा. फलोदी जिल्हा जोधपुर राजस्थान येथील आहेत. सदर आरोपींनी वापरलेली गाडी ही एम. एच. 20/एफ. वाय. 9410 क्रमांकाची चोरीची असून छत्रपती संभाजी नगर येथील शहर परिसरातील, दि .28 जुलै रोजी एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशन छत्रपती संभाजी नगर येथून चोरीला गेली होती . सदर गाडीवर याअफू तस्करांनीआरजे 45/ सीजे 6205 क्रमांकाचा नंबर प्लेट लावून गाडी अफू तस्करीत वापरली आहे . या गाडीमध्ये नशेच्या अफूचे टरफल जवळपास 16 पोत्यामध्ये कोंबून भरलेले आढळले ज्याचे वजन 307 किलो असून 20,000 किलोप्रमाणेहा मालबाजारात विकला जातो . पोलिसांनी केलेल्या कारवाईनुसार 82,51,710 रुपये चा मुद्देमाल जप्त केला आहे. मादक द्रव पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार सदर कारवाई करण्यात आली.सदर वेळी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुलहसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, जवाहरनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार भिमाजी पाटील, पीएसआय पुरुषोत्तम राठोड , भंडारा नायब तहसीलदार महादेव दराडे यांच्या समक्ष कारवाई करण्यात आली.