
भंडारा जिल्ह्यातील राजस्थानी ढाबा येथे अफू डोडा बोलविणाऱ्या आरोपीचा लावला शोध
भंडारा / प्रविण भोंदे
दिनांक २९ जुलै २०२५ रोजी पोलीस स्टेशन जवाहरनगर हद्दीत SR ग्रॅड हॉटेल शहापुर येथे सफारी कारमध्ये ३०७ कि.ग्रॅ. अंमली पदार्थ अफु डोडा मिळून आल्याने पोलीस स्टेशन जवारनगर गुन्हा क्र २७८/ २०२५ कलम ८ ( क ), १८ ब), २९ गुंगीकारक अंमली पदार्थ कायदा अन्वये नोंद असुन सफारी गाडी व डोडा मुद्देमालासह जप्त करून दोन आरोपी यांना अटक केली . दोन्ही आरोपी हे अफू डोडा स्विकारणाऱ्या आरोपीचे नाव व पत्ता माहित नसल्याचे सांगत होते. तसेच ते साधा कॉलचा वापर न करता झिंगी अँपव्दारे संभाषण करीत होते. त्यामुळे पुढील आरोपींचा शोध घेणे चॉलेजींग झाले असतांना मोठ्या सिताफिने स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी अटक केलेले आरोपी दिलीम गंगाराम बिश्नोई याला गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने विश्वासात घेवून खोल विचारपुस केली असता, आरोपी यांनी आम्ही यापुर्वी दोनदा डोडा सोडून द्यायला भंडारा येथे आल्याची बुली दिली. त्यादरम्यान प्रथम फेरीत डोडा स्विकारणार्या व्यक्तीने खाली गाडी सोडुन देते वेळी आपल्या सोबत महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची गाडी आणली होती व तो व्यक्ती राजस्थानी भाषा बोलत होता असे सांगीतले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा पथकाने तपासाचे चक्र फिरवीत माथनी टोल ते साकोली टोल प्लाझा तपासणी केली तसेच भंडारा ते देवरी पर्यंत आरोपीने सांगीतल्याप्रमाणे राजस्थानी ढाबे चेक करून ढाबा मालकाचे व गाडीचे छायाचित्र मोबाईल व्दारे दाखवुन अफू डोडा स्विकारणाऱ्या इसमाचा शोध घेत असतांना दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी दिलीप बिश्नोई याने, विरतेजा राजस्थानी ढाबा कन्हाळमोह मालक आरोपी नामे भजनलाल नेमीचंद यादव, वय 28 वर्ष, रा. निमचौक, धारणा, ता.जाईल. जिल्हा नागौर, (राजस्थान ) ह.मु. विरतेजा राजस्थान ढाबा, फराज सिद्धीकी याचे पेट्रोल पंप जवळ कन्हाळमोह, ता. जि. भंडारा. याला व त्याच्या महिद्रा बोलेरो गाडीला ओळखले. त्यानंतर राजस्थानी ढाबा मालक आरोपी याला ताब्यात घेवून पोलीसांचा हिस्का दाखवुन विचारपुस केली असता त्याने अंमली पदार्थ अफु डोडा आरोपी दिलीप याच्या मार्फत भंडारा येथे तिनदा बोलाविल्याची कबुली दिली. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांनी अथक तपास करून डोडा बोलावुन विक्री करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला. नूरूल हसन पोलीस अधीक्षक भंडारा, निलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या मार्गदर्शनात नितीनकुमार चिंचोळकर, पोलीस निरीक्षक स्था.गुन्हे शा, भिमा पाटील पोलीस निरीक्षक ठाणेदार जवाहरनगर, स्था.गु.शा. एनडीपीएस व उपविभाग भंडारा पथकातील अधिकारी सपोनी केशव पुंजरवाड , अंमलदार पोहवा विजय राऊत , रमेश बेदुरकर , श्रीकांत मस्के, अंकुश पुराम, जगदिश श्रावणकर, योगेश पेठे, दिनेश राऊत यांनी सदरची कारवाई केली.