परतवाडा (ता. अचलपूर) / तालुका प्रतिनिधी
अमृत (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) व MCED यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘अॅडव्हान्स ब्युटी पार्लर’ प्रशिक्षण बॅचचा समारोप सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.सदर प्रशिक्षण 1 जानेवारी 2026 ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.

या बॅचमध्ये एकूण 32 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाला अमृतचे विभागीय व्यवस्थापक प्रवीणजी कोळेश्वर, उपव्यवस्थापक ऋषिकेश कथलकर, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी राजेश सुने तसेच आयोजक गजेश बहाड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रशिक्षिका जोशना राऊत मॅडम देखील यावेळी उपस्थित होत्या.लाभार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त करताना सांगितले की, या प्रशिक्षणामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून स्वरोजगाराच्या दिशेने पुढे जाण्यास प्रेरणा मिळाली आहे. अधिकाऱ्यांनी सर्वांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
योजनेविषयी संक्षिप्त माहिती
अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून सामान्य (ओपन) प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देते. या लक्षित गटात ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बनिया, बंट्स, नायर, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार आदी समाजघटकांतील पात्र लाभार्थी समाविष्ट आहेत.
