
जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरे या धोरणाची प्रभावी व गतिमान अंमलबजावणी करण्यासाठी आदर्श नेहरूनगर परिसरातील नझुल सीट क्रमांक29 प्लॉट क्रमांक 2,3,5,6,7 व सीट क्रमांक 30 वार्ड क्रमांक 15/1 मधील 200 ते 300 अतिक्रमण धारकांचे निवासी प्रयोजनासाठी केलेले अतिक्रमण तात्काळ नियमानुकुल करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी एससी मोर्चा शहर जिल्हा सरचिटणीस संजय आठवले यांच्या नेतृत्वात आशिष येरेकर जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.आदर्श नेहरूनगर येथील अनेक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र ठरलेल्या अनेक लाभार्थ्यांना डावलण्यात आले आहे आदर्श नेहरूनगर मधील निव्वळ आणि निव्वळ 78 अतिक्रमण धारक लाभार्थी यांचेच अतिक्रमण नियमित करून मालकी हक्काचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात आलेले आहेत. परंतु आज घटकेपर्यंत ही 200 ते 300 अतिक्रमण धारकांना जमिनीचे मालमत्ता पत्रक देण्यात आलेले नाही मालमत्ता पत्रक देताना तसेच अतिक्रमण नियमानुकूल करताना महानगरपालिका व नझुल अधिकारी यांनी आदर्श नेहरूनगर येथील नागरिकांवर भेदभाव केलेला आहे. तसेच कर्तव्यामध्ये अनिमितता केलेली आहे.
आदर्श नेहरूनगर परिसरातील अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील नझुल सीट क्रमांक 29 प्लॉट क्रमांक 2,3,5,6,7 व सीट क्रमांक 30 वार्ड क्रमांक 15/1 मधील रहिवासी यांचा प्रमाणित लेआउट नकाशा तयार असून नियमानुसार मंजूर करण्यात आलेला आहे.
तहसीलदार अमरावती यांचे पत्र क्रमांक प्रस्तुत-1/अतिक्रमण/कावी 2208/2020 दिनांक 09/10/2020 नुसार आदर्श नेहरूनगर येथील अतिक्रमण नियमानुकुल करण्यास काही हरकत नाही अशी मंजुरात दिलेली आहे. आणि उपविभागीय अधिकारी अमरावती यांनी सुद्धा सहमती दिलेली आहे. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी सुद्धा आदर्श नेहरू नगरचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी काहीही हरकत नसल्याचे अहवाल दिलेले आहेत. अशी सर्व विभागाची सहमती असताना सुद्धा महानगरपालिकेचे अधिकारी दिरंगाई व टाळाटाळ करीत आहेत असा आरोप भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा सरचिटणीस संजय आठवले यांनी लेखी तक्रारी द्वारे केला आहे.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर अमरावती यांनी महानगरपालिकेचे अधिकारी आणि नझुल अधिकारी यांना आदर्श नेहरूनगर चे अतिक्रमण नियमानुकूल करून प्रत्येक नागरिकाला पी. आर. कार्ड देण्याचे दिशा निर्देश देण्यात यावे अशी मागणी करण्यात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना आली आहे.
लेखी निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, आदर्श नेहरूनगर परिसराचा भाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत नाही सदर झोपडपट्टी ही अमरावती महानगरपालिका यांच्या क्षेत्रात येत असल्यामुळे आदर्श नेहरूनगर येथील सरसकट घरकुलांचे अतिक्रमण नियमानुकूल करण्यात यावे आणि सर्व रहिवासी नागरिकांना मालकी हक्काचे जमिनीचे पट्टे तथा मालमत्ता पत्रक,पी.आर. कार्ड देण्यात यावे अशी आग्रहाची मागणी भारतीय जनता पार्टी एससी मोर्चाद्वारे करण्यात आली आहे.
आदर्श नेहरूनगर मध्ये महावितरण कंपनीने लघुदाब वीज वाहिनीचे पोल रस्त्याच्या बाजूला उभे केलेले आहेत, स्थानिक रहिवासी यांच्या कोणाच्याही घरावरून विजेच्या तारा गेलेल्या नाहीत, आदर्श नेहरूनगर परिसरामध्ये भूमिगत 11 के.व्ही ची वीजवाहिनी उभारलेली आहे. पंतप्रधान मंत्री आवास योजनेचा लाभ आदर्श नेहरू नगर मधील सरसकट नागरिकांना मिळण्यासाठी सर्वांना मालकी हक्काचे प्रॉपर्टी कार्ड तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे. मनपा आयुक्त अमरावती कार्यक्षेत्र आणि महसूल विभागाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या सर्व शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण केलेल्या रहिवासी यांना प्रॉपर्टी कार्डाची आतुरतेने प्रतीक्षा आहे. अनेक वर्षापासून अमरावती महानगरपालिकेकडे मागणी केली जात आहे. परंतु अमरावती महानगरपालिकेचे याकडे भयंकर दुर्लक्ष व दिरंगाई आदर्श नेहरू नगरच्या प्रॉपर्टी कार्डच्या वितरणामध्ये होत आहे. भारतीय जनता पार्टी एससी मोर्चा शहर जिल्हा सरचिटणीस संजय आठवले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,जिल्हाधिकारी यांनी याकडे त्वरित लक्ष घालून आदर्श नेहरूनगर येथील सरसकट रहिवासी यांना मालकी हक्काचे प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे. अन्यथा भविष्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा एससी मोर्चा शहर जिल्हा सरचिटणीस संजय आठवले यांच्या नेतृत्वात धनराज चक्रे,सचिन पाटील, प्रमोद खंडारे, जयंत औतकर, सचिन डाके, सदानंद चोर पगार,आनंद वरठे, अब्दुल रहीम ठेकेदार, नईम अली नियाज अली, सय्यद मौलाना, इसराइल भाई, राजेश श्रीवास,प्रशांत साखरकर, विक्रम ढोके,प्रल्हाद दामोदरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी दिला आहे.