नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
शासनाच्या निर्णयाप्रमाणे एकूण 7 घटक यावर काम करून हे अभियान कसे राबवावे याबाबत संपूर्ण मार्गदर्शनाचे धळे गावकरी मंडळींना देण्यात आले. व तसेच अभियानकाळा मध्ये शासनाने आखून दिलेल्या प्रश्नावलीच्या अधीन राहून योग्य ते पालन करून नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपरी रिठे येथिल ग्राम पंचायत मध्ये अभियान यशस्वी करण्याकरिता गावकऱ्यांनी शपथ घेतली अभियानामध्ये मानांकन वर काम करण्याकरिता गावकऱ्यांमध्ये व खासकरून युवक मंडळी यांनी कंबर कसली आहे.त्याचबरोबर गावात एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अभियान राबवताना गावाचा फायदा म्हणजे ज्या उणिवा गावात आहे त्या पूर्ण करता येईल व जे आहे ते टिकवता येईल.त्याकरिता जोमाने गावातील सर्व गावकरी यांच्यात आनंदाचे वातावरण असून हे अभियान संपूर्णपणे यशस्वी करण्याचे शपथ घेतली असून अभियान राबविण्यात कुठेही कमी पडणार नाही असे गावकऱ्यांनी आश्वासन दिले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच योगिता विशाल रिठे कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी विक्रम पिसे यांनी केले या ग्रामसभेला मार्गदर्शन माजी सरपंच विशाल रिठे यांनी केले या वेळी या ग्रामसभेला गावातील उपसरपंच पुष्पा राजू प्रगने, ग्रामपंचायत सदस्य सुचिता प्रदीप डोंगरे, पुष्पा रमेश रिठे, दीपिका किशोर रिटे, प्रतिक ज्ञानेश्वर रिठे,गणेश धामणे, पोलीस पाटील,संदीप डोंगरे, तंटामुक्ती अध्यक्ष शम्मी पठाण,तलाठी सुभाष थोरात साहेब,कृषी सहाय्यक साधना मांडोगळे मॅडम,मुख्याध्यापक बोन्डे,सर गावातील अंगणवाडी सेविका,आशा वर्कर, सीआरपी,रोजगार सेवक,व गावातील मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते . सर्व गावकरी मंडळींनी मिळून ऑनलाईन ग्रामसभा व मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम पाहून आपले गाव पुरुस्कृत होईल याकरिता सर्वांनी निर्धार केला.
