
चांदूर बाजार / तालुका प्रतिनिधी
गेल्या तीन वर्षांपासून अनाथाची नाथ बनली ईश्वरी राऊत आई व वडील नसल्याने वळगाव येथे अनाथ झाली होती अशा परिस्थितीमध्ये वलगाव येथे कोणी आधार देणार या करिता मदतीची आस लावून बसली होती आई ची माय व वडिलांचे प्रेम मला मिळणार का ही वाट लावून बसली होती अपघात मध्ये आई वडील सोडून गेल्याने एकट्या परिस्थितीमध्ये गरीब कुटुंबांमध्ये मुलगी राहत होती मात्र कोणी मदत करायला तयार नाही होते अश्या परिस्थिती मध्ये ईश्वरी ची माहिती जीवन आधार संस्थेला उपलब्ध झाली संस्थेचे अध्यक्ष जीवनदादा जवंजाळ आणि संस्थेचे सहसचिव सुयोग गोरले यांनी कुठलाही विचार न करता त्या मुलीला दत्तक घेऊन एक खूप मोठा आधार दिला आहे या करिता तिला लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा तिला पुरवण्यात येतात याकरिता अनेक दानशूर व्यक्तिमत्व सुद्धा या मुलीला मदतीचा आधार देतात या करिता अनेकदा ही माहिती चांदुर बाजार मध्ये माहिती मिळताच चांदूर बाजार तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय भास्करदादा टोम्पे आदरणीय अशोककराव हरकूट सर, आदरणीय प्रभाकर भट्ट सर यांनी तिला नेहमी मदतीचा आधार दिला आहे आज ऑरेंज इंग्लिश स्कूल येथे त्या मुलीचे शिक्षण फ्री मध्ये करण्यात आले आहे,आज ती तिसऱ्या वर्गा मध्ये शिकत आहे तर तिला लागणारे शालेय साहित्य हे आज जीवन आधार संस्थेचे अध्यक्ष जीवनदादा यांनी तिला दिले आहे अश्या परिस्थिती मध्ये आपण सुद्धा अनाथाचे नाथ बनवून एका गरजूवंतांना नक्की मदतीचा आधार द्या आपण केलेल्या मदतीने परमेश्वर आपल्याला नक्की बळ देतो.