
शहीद स्मारकाच्या खोट्या श्रेयावरून संघर्ष युवा संघटनेचा आक्रमक विरोध
तहसीलदार,ठाणेदार याना निवेदन देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान धामणगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड यांनी नांदगाव खंडेश्वर येथील शहीद विकास उईके यांच्या स्मारका करीता जागेचा विषय आपण मार्गी लावल्याचा खोटा प्रचार करून जनतेची फसवणूक केली असा आरोप संघर्ष युवा संघटनेने करत जोरदार निषेध नोंदवला आहे.
आणि नांदगाव खंडेश्वर शहरातून रॅली काढून आमदार प्रताप अडसड यांचा जाहीर निषेध केला.शहीद विकास उईके यांच्या स्मारका करीता जागेचा प्रश्न निकाली काढण्यात आल्याबद्दल आमदार प्रताप अडसड यांच्या आभराचे फलक नांदगाव खंडेश्वर शहरात ठिकठिकाणी लावून आमदार अडसड यांनी स्वतः याकरिता कोणताही प्रयत्न न करता फुकटचे श्रेय घेतल्याने संघर्ष युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
त्यामुळे संघटनेने नांदगाव खंडेश्वर शहरातून निषेध रॅली काढून आमदार प्रताप अडसड यांचा जाहीर निषेध केला आणि त्यानंतर तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन देऊन आमदार प्रताप अडसड व त्यांच्या कार्यकर्त्यांवर फसवणूक व जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकारामुळे समाजात संभ्रम निर्माण झाला असून शहीदांच्या स्मृतीशी संबंधित विषयावर राजकीय स्वार्थासाठी खोटा प्रचार करणे हे अत्यंत निंदनीय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.यावेळी
संघटनेने “गद्दार आमदार” असे मोठमोठे पोस्टर शहरात लावून आमदार अडसड यांचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. यावेळी संघर्ष युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आमदारांच्या खोट्या प्रचाराविरोधात घोषणा देत जनतेला जागरूक करण्याचा प्रयत्न केला.शहीदांच्या स्मृतीचा अवमान करणाऱ्या कोणत्याही राजकीय व्यक्तीचा निषेध करणे हे आपले कर्तव्य आहे. सत्य समोर आणण्यासाठी आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करत असून लवकरच याप्रकरणी ठोस कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे.असल्याचे यावेळी संघटनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.