ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी..
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी-शेतमजुरांचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी , अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर ढोल पिटो.आंदोलन करीत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा केला निषेध. अतिवृष्टीग्रस्तांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी,

प्रति एकर 50 हजार रुपये पीक नुकसान भरपाई द्यावी, रोजगार बुडालेल्या शेतमजुरांना, ग्रामीण व शहरी कामगारांना श्रमनुकसान भरपाई म्हणून प्रति कुटुंब तातडीने 30 हजार रुपये महिना मदत द्यावी व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.
ढोल पिटो आंदोलनाच्या प्रमुख मागण्या :
1) ओला दुष्काळ जाहीर करावा.
2) शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये पीक नुकसान भरपाई मदत तातडीने द्यावी. 3) रोजगार बुडालेल्या शेतमजुरांना, ग्रामीण व शहरी कामगारांना श्रमनुकसान भरपाई म्हणून प्रति कुटुंब तातडीने 30 हजार रुपये महिना मदत द्यावी.
4) शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी.
5) प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यापुर्वी असलेले 1. पेरणी न होण्याची परिस्थिती (Prevented Sowing) 2. प्रतिकुल हवामान (Mid season Adversity), 3. स्थानिक आपदा (Local Calamity) 4. पीक कापणी पश्चात आपदा (Post Harvest Calamity) संरक्षण पुन्हा लागू करावे व योजना कॉर्पोरेट कंपन्याऐवजी शेतकऱ्यांच्या लाभाची बनेल यासाठी योजनेत बदल करावेत.6) अतिवृष्टी व पुरामुळे रस्ते, पूल, बंधारे, तलाव, वीज वितरण कंपनीचे रोहीत्र, विजेचे खांब वाहून गेलेले आहेत, या सर्वांची तातडीने दुरुस्ती करणेबाबत विशेष दुरुस्ती कार्यक्रम राबवून दुरुस्ती करावी.
7) ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना जमीन बाजारभावाप्रमाणे मोबदला द्यावा.
8) ज्या शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे पशुधन पुरामध्ये वाहून गेले आहे अशा शेतकऱ्यांना त्या पशुधनाची भरपाई म्हणुन बाजार मुल्याप्रमाणे रक्कम द्यावी.
9) अतिवृष्टीमुळे ज्या नागरिकांची व जनावरांच्या गोठयांची पडझड झाली आहे त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी.
10) शाळा महाविद्यालयातील पदवी व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींची सर्व फी माफ करावी.
11) गायरान जमीन कसत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचा सर्वे करून पीक नुकसान भरपाई मिळावी. या मागण्याचे निवेदन नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांचे मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले.

सदरच्या मागण्यांवर . अतिवृष्टीचे पंचनामे करत असताना भेदभाव व राजकारण होता कामा नये हा आग्रह शिष्टमंडळाने लावून धरला. अनेक बँकांनी शेतकऱ्यांना केवायसी करण्याबाबत सक्ती केली आहे याबाबत तीव्र नाराजी आंदोलकांनी व्यक्त केली. काही ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा येत आहेत, याबाबतही आंदोलकांनी संताप व्यक्त केला. आत्महत्याग्रस्त कुटुंबांकडे प्रशासनाचे कुणीही जात नाही. यावेळी निवेदन देताना. किसान सभा जिल्हा सचिव श्याम शिंदे, तालुका सचिव दिलीप मह्हले, अशोक केसरखाने, प्रभाकर खडसे, प्रवीण पुराम, शाकीर शाह, शत्रुघ्न मगर, मधुकर कांबळे, प्रवीण गावनर, सुखदेव पारवे, उद्धवराव देवरे, वसंत खडसे, पुंडलिक मारबदे, हरिभाऊ मारबदे, दत्ता शेंडे, भास्कर कुंभरे, दिलीप गावंडे, ओंकार कुर्जेकर, सुभाष डोक, अरविंद गजभिये, किशोर मसराम, किशोर बेले, प्रतीक सुने, विठ्ठल झिमटे, गणेश सोनवणे, बबलू भाई, बाबा भाई, रामदास मते, ज्ञानेश्वर शिंदे, अब्दुल मोहसीन, नरेश वट्टी, पुंडलिक पुंड, राजगुरू शिंदे, संजय मारबदे आदी शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सद्भावना चौक, येथून ढोल पिटो आंदोलनाची सुरुवात झाली. दत्ता चौक,मुंगसाजी चौक, नगरपंचायत चौक, बस स्टॉप परिसर, तहसील कार्यालयावर गगनभेदी घोषणा देत ढोल पिटो आंदोलन केले.
