आरोग्य शिबिर, शासकीय योजनांचा लाभ व वृद्धाश्रमात भोजनदान उपक्रम
अंजनगाव बारी / पवन इंगोले
बडनेरा विधानसभा मतदार संघाचे कर्तव्य दक्ष आमदार रवी राणा यांच्या वाढदिवसानिमित्त “वाढदिवस नव्हे, जनसेवा दिवस” या संकल्पनेतून भव्य महाराजस्व अभियान राबविण्यात येत असून, २८ एप्रिल २०२६ रोजी अमरावती येथे विविध जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या अभियानांतर्गत नागरिकांना सर्व शासकीय व निमशासकीय योजनांचा एकत्रित लाभ देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पीआर कार्ड, रेशन कार्ड, घरकुल मंजुरी प्रमाणपत्र, लेक लाडकी योजना, कृषी योजनांअंतर्गत नवीन विहीर, संजय गांधी योजना यांसारख्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना दिला जाणार आहे. तसेच सिंचन विहिरी, विशेष घटक योजना, नवीन ई-शिधापत्रिका, उत्पन्न व जात प्रमाणपत्र, नॉन क्रीमिलियर आदी सेवाही एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.आरोग्य सेवेलाही विशेष प्राधान्य देण्यात आले असून, मोफत आरोग्य तपासणी शिबिरात रक्तदान, नेत्र तपासणी, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्ट्रोक, कर्करोग, हाडांचे आजार व किडनी तपासणीसह औषध वाटप व अँब्युलन्स सेवा उपलब्ध राहणार आहे. “रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून हा उपक्रम राबविला जात आहे.याचबरोबर ‘जनसेवा दिवस’ निमित्त मधुबन वृद्धाश्रम, बडनेरा येथे भोजनदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, वृद्धांना सन्मानपूर्वक सेवा देण्याचा संदेश देण्यात येणार आहे.
👉 दिनांक : २८ एप्रिल २०२६
👉 वेळ : सकाळी १०:०० वाजता / दुपारी १२:०० वाजता
👉 स्थळ : नवीन अमरावती तहसील कार्यालय परिसर व मधुबन वृद्धाश्रम, बडनेरा
या उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले असून, “वाढदिवस नव्हे, जनसेवा दिवस” या संदेशातून समाजोपयोगी कार्यांची नवी दिशा देण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.
