नगरसेवक वासुदेव लोखंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
लवकरच होणार दोन्ही बाजूने संरक्षण भित
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर येथील इंदिरा आवास झोपडपट्टीच्या मागील बाजूने जाणाऱ्या लेंडी नाल्याचे वाहते पाणी हे आजुबाजूच्या नागरिकांच्या घरात जाऊन त्यामुळे सरपटणारे प्राणी नागरिकांच्या घरात जात असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता.

त्याचप्रमाणे नाल्याचे खोलीकरण नसल्याने नाल्याचे पाणी सर्व शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्यांच्या पिकाचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरिक आणि शेतकऱ्यांनी नगरपंचायतचे या प्रभागाचे नगरसेवक तथा पाणीपुरवठा व जलसंधारण सभापती वासुदेव लोखंडे यांचेकडे अनेक तक्रारी केल्याने त्यांनी याबाबत ताबडतोब दखल घेऊन मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांना यावर तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली असता मुख्याधिकारी यांनी कोणताही विलब न करता या नाल्याचे खोलीकरण करण्याचे आदेश यत्रनेला देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून हे काम पूर्ण केले त्याचप्रमाणे या नाल्याच्या दोन्ही बाजूने सिमेंट कोकरेटीकरण करून संरक्षण भित बांधण्याची मागणी नगरसेवक वासुदेव लोखंडे यांनी केली असता त्याबाबत मुख्याधिकारी यांनी प्रस्ताव तयार करून पाठविण्याचे निर्देश सुद्धा दिल्याने या नाल्याला आता लवकरच संरक्षण भित बांधण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याने इंदिरा आवास प्रभाग क्र.१ मधील रहिवासी आणि आजुबाजूच्या सर्व शेतकरी बांधवांनी नगरसेवक वासुदेव लोखंडे यांचे आभार व्यक्त केले आहे.
