दिल्लीतील संसदेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत
डॉ. मनीष गवई यांची विशेष उपस्थिती व सन्मान
अमरावती (जिल्हा प्रतिनिधी)
केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी राज्यसभेवर तिसऱ्यांदा शपथ घेतल्याबद्दल दिल्लीतील संसद भवनात त्यांचे विशेष स्वागत व अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष शोभा शंकरराव गवई यांनी पुष्पगुच्छ देऊन ना. आठवले यांचा सत्कार केला.डॉ. गवई हे सामाजिक न्याय मंत्रालयाचे अध्यक्षांचे खासगी सचिव असून, भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. तसेच ते विशेष निमंत्रित सदस्य व महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या उपस्थितीत झालेला हा सत्कार सोहळा विशेष ठरला.या वेळी उपस्थित मान्यवरांनी ना. रामदास आठवले यांच्या राजकीय कार्याचा गौरव करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्यसभेवर तिसऱ्यांदा शपथ घेणे ही मोठी कामगिरी असून, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाची दखल घेतली गेली.सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या अभिनंदन सोहळ्यामुळे अमरावती जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर उजळले आहे.
