सामाजिक न्याय व युवा धोरणांवर सखोल विचारविनिमय
राज्याच्या विकासासाठी समन्वय वाढवण्यावर भर
अमरावती (जिल्हा प्रतिनिधी)
महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याशी अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष शोभा शंकरराव गवई यांनी अलीकडेच सविस्तर चर्चा केली. या भेटीत सामाजिक न्याय, युवा सक्षमीकरण तसेच राज्यातील विविध विकासात्मक उपक्रमांवर महत्त्वपूर्ण विचारविनिमय झाला.डॉ. मनीष गवई हे भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाचे खासगी सचिव तसेच राष्ट्रीय युवा पुरस्काराचे मानकरी आहेत. याशिवाय ते महाराष्ट्र शासनाचे विशेष निमंत्रित सदस्य व विशेष कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ राज्यातील धोरणनिर्मिती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.या चर्चेदरम्यान राज्यातील वंचित घटकांसाठी अधिक प्रभावी योजना राबविणे, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि सामाजिक समतेसाठी ठोस पावले उचलणे यावर भर देण्यात आला. उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनीही या बाबतीत सकारात्मक प्रतिसाद देत शासनाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची ग्वाही दिली.या भेटीमुळे अमरावतीसह संपूर्ण राज्याच्या विकासासाठी प्रशासन आणि धोरणकर्त्यांमध्ये समन्वय वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
