राज्य परिवहन महामंडळाच्या ग्रामीण भागात बस फेरी सुरू.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर परिसरातील मुख्यत्वे येणस व टोंगलाबाद , बग्गी.जवळा.राजुरा, वाई, बोरी, निंबा, किरजवळ, धोतरा, इत्यादी गावातून नांदगाव खंडेश्वर येथे शिक्षणाकरिता येणाऱ्या चिमुकल्या पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत शेकडो विद्यार्थी हे ये जा करीत असतात मात्र सकाळच्या सत्रात परिसरातून नांदगावकरिता बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवास समस्या निर्माण होत होती या गंभीर समस्येची दखल घेऊन टोंगलाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल संगीतराव हजारे यांनी अथक परिश्रम घेत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय मा.श्री. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याशी पत्रव्यहार करून राज्य परिवहन मंडळाला सदर वेळेत परिसरातून नांदगाव खडेश्वर करिता बस सुरू करण्यास भाग पाडले.

शैक्षणिक सत्र संपत असले तरी सदर बस सुरू केली. असल्याचा आनंद विद्यार्थी वर्गात व्यक्त होत असून सदर बस निरंतर सुरू राहावी अशी मागणी सुद्धा होत आहे सदर बस सुरू करण्यास राहुल संगितराव हजारे संस्थापक स्वराज्य प्रशासकीय अकॅडमी नांदगाव खंडेश्वर यांनी केलेले प्रयास आणि त्यांचे प्रयत्नांना पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद याबाबत विद्यार्थी आभार व्यक्त करीत आहे..शैक्षणिक क्षेत्रात नांदगाव खंडेश्वर किंगचे भूमिकेत एसटी प्रशासन नांदगाव खंडेश्वर तालुक्याला महत्व देत नसले तरी त्यामुळे नांदगाव खंडेश्वर शहराचे शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व कमी करता येत नाही डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म झालेल्या नांदगाव तालुक्यात तब्बल आठ महसूल मंडळाचा विस्तार हसून येथील नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे हजारो विद्यार्थी प्रवेशित असतात तसेच एकलव्य, एस.ओ.एस.के. गुरुकुल, अभिनव , वाय. ई. एस. रामराव भोयर. हायस्कूल .जाकीर हुसेन उर्दू .आयटीआय .सह राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय , अनेक विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे शैक्षणिक कार्याचा भार उचलत असुन हि बस चादुर वरुन सकाळी 5.45 ला सुटत असल्याचे मत श्री.जयंत झाडे.आगार व्यवस्थापक.निलेश भगत सहाय्यक वाहतुक अधिक्षक..यांचे पालक व विद्यार्थी यांचे कडुन कौतुकाचा वर्षाव होत आहे .तसेच नांदगाव खंडेश्वर चे दैनिक युवक आधार चे तालुका पत्रकार प्रदिप रघुते , भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य तरहेकर तसेच टोंगलाबाद चे सरपंच तुळशीदासजी शेबे.राजुरा येथिल विलास भुजाडे.राजेश अजमिरे.सुनिल देशमुख.प्रकाश बांडाबुचे चंदुभाऊ देशमुख, राहुल धरणे व समस्त गावकरी मंडळी राजुरा, यांनी एस टी बस चालक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
