बडनेरा (वार्ताहर)
शासनमान्य ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था,नाशिक महाराष्ट्र राज्य च्या वतीने ” शिवरायांना डोक्यावर न घेता डोक्यात घ्या ” या विषयावर शिवव्याख्याते प्रा.सचिन देवरे पाटील ( जळगाव ) यांचे जाहीर व्याख्यान तसेच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या गुणीजणांना छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार 2026 चा कार्यक्रम नुकताच नाशिक येथील रोटरी क्लब सभागृह मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सदर कार्यक्रमां मध्ये बडनेरा शहरातील आपले सर्वांचे परिचित क्रीडाशिक्षक तसेच महाराष्ट्रीयन क्रीडा संस्कृती मर्दानी क्रीडा प्रकार चा प्रचार व प्रसार करून मुला मुलींना निशुल्क प्रशिक्षण देणारे, कराटे प्रशिक्षक सोनल रंगारी सर यांना नुकताच नाशिक येथे ” छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार 2026″ ने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निसर्गोपचार तज्ञ डॉ.रावसाहेब घोडेराव, संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल वाघ, दैनिक आपलं महानगर चे वरिष्ठ उपसंपादक चंद्रमणी पटाईत, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.अविनाश शिंदे, वैद्यकीय महिला आघाडी च्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.चंचल साबळे, महिला विकास महामंडळाच्या माजी जिल्हा व्यवस्थापिका नीलिमा साठे,

मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक मंडळाचे सचिव रवींद्र कुमार गायकवाड संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल आठवले,सचिव मिलिंद कळवणकर, श्री सुनील आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.सोनल रंगारी सर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते प्रा.अमोल मिलखे सर बडनेरा शहरातील सन्माननीय नगरसेवक अजय भाऊ जयस्वाल , किशोर भाऊ जाधव, भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेरा चे अध्यक्ष दरिया भाऊ गायकवाड तसेच सर्व पदाधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीचे सर्व पदाधिकारी,तसेच शहरातील सर्व वरिष्ठ पत्रकार बंधू ,सामाजिक कार्यकर्ते, सर्व गणमान्य नागरिक यांनी या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.
