सततच्या पाठपुराव्याला अखेर मिळाले यश
नांदगावातच मिळणार आरक्षण सुविधा
25 किमीचा प्रवास संपला – तालुक्यातच उपलब्ध सेवा
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सा.बा. विभागाशी संबंधित तक्रार, निवेदने, अर्ज, स्वीकृती प्रक्रिया आणि स्थानिक नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्रांसंदर्भातील आरक्षण मिळण्याची सोय आता विश्रामगृहातच उपलब्ध होणार आहे.

आतापर्यंत नागरिकांना 25 किमी अंतरावर बडनेरा येथे जावे लागत होते. अनेकांना यामुळे त्रास, वेळेची नासाडी तसेच प्रवासाचा खर्च सहन करावा लागत होता. या गैरसोईची दखल घेत उत्तम न. ब्राह्मणवाडे, विभागीय अध्यक्ष (अमरावती विभाग), युवा ग्रामीण पत्रकार संघ यांनी मागील काही महिन्यांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.

अखेर सा.बा.विभागाकडून आदेश निर्गमित करून नांदगाव खंडेश्वर येथील विश्रामगृहात तात्पुरती आरक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामीण भागातील शेकडो लोकांचा वेळ व खर्च वाचणार आहे. संबंधित विभागाची अधिकृत आदेश पत्रे जारी झाली असून स्थानिक वर्तमानपत्रांनीही या महत्त्वपूर्ण निर्णयाला प्रमुखता दिली आहे.स्थानिक पातळीवर सुसज्ज व्यवस्था तयार करून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरू राहील, असे ब्राह्मणवाडे यांनी सांगितले.

