कष्टाला मिळाला मानाचा मुजरा
गोरख बोरकर या युवकाचा थक करणारा जीवन प्रवास
वाशिम / जिल्हा प्रतिनिधी
रिसोड तालुक्यातील मौजे. नंधाना या ग्रामीण भागामध्ये राहणारा व सामान्य परिस्थिती मधून असामान्य व्यक्तिमत्व सिद्ध करणारा एक युवक लहानपणापासूनच सामाजिक राजकीय वैचारिक चळवळीमध्ये झालेली ती जडणघडण आणि आज महाराष्ट्राच्या महामंचावर सर्व सामान्य शेतकऱ्याचा मुलाला आदर्श उपसरपंच म्हणून जी संधी मिळते आहे, ती नक्कीच त्यांच्या कार्याला उजाळणी सलाम देणारी आहे, जनसेवा हीच ईश्वर सेवा हेच मनी धनी ध्यानी धरत गोरख पाटील यांनी आपल्या आयुष्याला सुरुवात केली, आपणही कुणाचे तरी काही देणे लागतो या आशेने आपले संपूर्ण आयुष्य जनसामान्य गोरगरीब, कष्टकरी कामगार, विद्यार्थी,समाजातील सर्वच घटकांना विविध राजकीय पदाच्या जवाबदाराच्या माध्यमातून न्याय देण्याचा मानस गोरख पाटील बोरकर यांचा राहिलेला आहे, अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना देखील त्यांनी समाजसेवेची नाळ कधी तुटू दिली नाही, आपल्या सामाजिक राजकीय प्रवासामध्ये आदर्श ग्रामपंचायत नंधाना येथे 2016 मध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या थाटापाटात साजरी करून शिव विचारांचे वादळ गावामध्ये प्रस्थापित करणारा हा युवक शिवरायांचा खरा मावळा ठरला आहे, आपल्या गावातला कोणताच युवक व्यसनाच्या आहारी जाऊ नये म्हणून 2018 मध्ये पहिला दारूबंदीचा ठराव घेऊन दारू मुक्त करणारा पहिला उपसरपंच ठरला आहे, म्हणूनच 2019 मध्ये ग्रामस्थ मंडळींनी वयाच्या 18 व्या वर्षी बिनविरोध तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवड केली, त्यासोबत कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण गाव निराशा मध्ये असताना गावामध्ये पालेभाज्यांचा वाटप, गावामध्ये कोरोनाची जनजागृती केली व गावात उत्साहाचे वातावरण केले,

2019 पासून दरवर्षी कबड्डी प्रेमी यांच्यासाठी भव्य दिव्य अशा प्रकारच्या कबड्डीच्या स्पर्धा ठेवणारा हा पहिला उपसरपंच युवक ठरला आहे, 2022 पासून तर आजपर्यंत गावामध्ये विचारांची जयंती साजरी व्हावी प्रबोधनाची जयंती साजरी व्हावी म्हणून महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून गावासमोर गोरख बोरकर यांनी आदर्श उभा केला आहे, आपल्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा वाचावी पटसंख्या वाढावी जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारावा म्हणून शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लॅब आरोचे पाणी अशा डिजिटल सुविधा गावामध्ये उपलब्ध करून आदर्श जिल्हा परिषद शाळा यासाठी गोरख पाटील यांचे अत्यंत महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे, गावातील प्रमुख रस्ते, शेतपादन रस्ते व्हावे म्हणून निधी खेचून आणून पारदर्शकपणे काम करून घेणारा हा युवा कार्य तत्पर उपसरपंच ठरला आहे, अशा विविध केलेल्या कामाचा आढावा घेत ग्राम.नंधाना येथील श्री. गोरख उद्धवराव बोरकर पाटील यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आदर्श राज्यस्तरीय उपसरपंच पुरस्कार 2026 जाहीर केला आहे, सरपंच सेवा संघाचे समर्थक बाबासाहेब पावसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे साहेब,आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, ग्रामसेवक नेते एकनाथराव ढाळणे साहेब, यांच्यासह दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते व यादवराव पावसे पाटील,रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा रविवार दि. 5 एप्रिल 2026 रोजी स. 11: 00 वा माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड अहिल्यानगर येथे संपन्न होणार असून त्या पद्धतीचे निमंत्रण पत्र निवड पत्र गोरख पाटील यांना मिळालेले आहे, वाशिम जिल्हातुन गोरख बोरकर पाटील यांचा सन्माना सह शुभेच्छाचा वर्षाव होतं आहे.
