अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष गवई यांच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा
अमरावती (जिल्हा प्रतिनिधी)
राज्यसभेचे खासदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आदरणीय खा. चंद्रकांतजी हांडोरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.यावेळी अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष शोभा शंकरराव गवई यांनीही त्यांना मनःपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. गवई हे सामाजिक न्याय मंत्रालयाचे खासगी सचिव, भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्तकर्ता तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष निमंत्रित सदस्य व विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.यावेळी त्यांनी खा. हांडोरे साहेबांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकल्याण व सामाजिक न्याय क्षेत्रात अधिकाधिक कार्य घडत राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
