नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी
श्री विठ्ठल रुक्माई मंदिर वेणी गणेशपुर,,तालुका नांदगाव खंडेश्वर
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज निमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 40 वे* पवित्र ते कुळ पावना ते देश तेथे हरीचे दास जन्म घेती, पवित्र पावन साधुसंतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली नगरी *वेणी गणेशपूर*.ज्या गावामध्ये अनेक साधुसंत जन्माला आले आणि वारकरी संप्रदायातले मोठमोठे महान रत्न या परिसरामध्ये कीर्तन भागवत या सप्ताह निमित्त येत होते. असं पवित्र गाव त्या गावांमध्ये काल कीर्तन सेवा पार पडली ज्याच्या पवित्र मुखातून भाविक भक्त गन कथा श्रवण करत आहे.. असे कथा प्रवक्ते *हरिभक्त परायण आदरणीय श्री पंकज महाराज पोहोकार* *सोनी मराठी फेम* रा. मांजरी मसला तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती. अत्यंत ज्ञानवंत किर्तीवंत चालीरीती परंपरा वारकरी संप्रदायाचा दंडक जोपासणारे विद्ववत्त प्राप्त महाराज त्यांच्या वाणीतून भक्तगण कथा श्रवण करत आहे.. अनेक महाराष्ट्रातील मोठे मोठे महाराज मंडळी या गावांमध्ये आपली कीर्तन सेवा आनंदाने साजरी करत आहे, परिसरातील अनेक विदेही संत या भागवत सप्त्यामध्ये उपस्थिती दर्शवत आहे.. अत्यंत सातवीक आध्यात्मिक परमार्थिक गाव गावातील सर्व मान्यवर तरुण वर्ग भक्ती महिला भगिनीसात्विक भाव अत्यंत आनंददायी सोहळा पार पडत आहे. प्रातःस्मरणीय हरिभक्त परायण रघुनाथ महाराज यांची समाधी,, बालाजी महाराज,, जुने महादेवाचे मंदिर व त्याचबरोबर परिसरात जवळच खेकडी देवस्थान प्रातःस्मरणीय सरजू महाराज समाधी असे या गावांमध्ये जुने मंदिर आहे व त्या मंदिरामध्ये वर्षातून पाच ते सात भागवत सप्ताह होतात.. मोठे मोठे कीर्तनकार भागवत कथा प्रवक्ते महाराज मंडळी या गावांमध्ये येतात वारकरी संप्रदायाची नाळ जोडून असलेलं गाव. ज्ञानदान श्रवण भक्तीदान त्याचबरोबर गावाचा इतिहास सुद्धा आहे .

या गावाचं इतिहासामध्ये नाव आहे *बाकाबाईची वेणी* म्हणून प्रसिद्ध गाव आहे. इतिहासकालीन *नागपूरची भोसले* परिवारातील या गावची लेखबाय सून म्हणून होत्या आजही इतिहास आहे असं हे इतिहास कालीन गाव आहे. गावातील तरुण वर्ग तत्पर आहे. एकता संघटन गावामध्ये आहे. अत्यंत भक्ती भाव काल कीर्तनामध्ये उपस्थित भाविक भक्तगण यांच्या उपस्थितीमध्ये पाहायला मिळाला. सुनील मारोटकर,गजानन जोगे, अजबराव जोगे, हरिभक्त परायण श्री रहाणे महाराज* व सर्व मंदिराचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य कार्यकारी मंडळ मित्रपरिवार समस्त ग्रामवासी वेणी गणेशपुर सर्वांचे मनापासून धन्यवाद आभार. अत्यंत चांगल्या प्रकारे येथे भागवत कथा भाविक भक्तगण श्रवण करत आहे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार ज्ञानदान भक्ती दान वाढत राहो यासाठी सतत कार्यरत असणारे वारकरी महाराज मंडळी टाळकरी, विणेकरी, गायनाचार्य उपस्थित होते परिसराचे वैभव असलेले मृदंगाचार्य मृदंग सम्राट हरिभक्त परायण श्री अंकुश महाराज पांढरकर चिखली रामनाथ आळंदीकर.. सर्वांनी मनापासून साथ दिली त्याबद्दल सर्वांचे मुकेश डी. चुडे महाराज माजी सैनिक समाज प्रबोधन युवा कीर्तनकार विद्यार्थी मार्गदर्शक दारव्हा यांनी सर्वांचे आभार मानले.
