पंचायत समिती सभागृहात सर्वानुमते अध्यक्षपदी सचिन करडे यांची निवड
माजी अध्यक्ष मोरेश्वर दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक बळकटीवर भर
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती सभागृहामध्ये आज ग्राम रोजगार सेवक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत संघटना बांधणी, संघटना अधिक मजबूत करणे तसेच नवीन तालुका अध्यक्षांची निवड या प्रमुख विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
माजी अध्यक्ष मोरेश्वर ज्ञानेश्वरराव दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. संघटनेची पुढील वाटचाल अधिक प्रभावी आणि संघटित पद्धतीने व्हावी यासाठी सर्व सदस्यांनी एकमताने भूमिका मांडली. चर्चेनंतर नवीन कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली.अध्यक्षपदासाठी धीरज मिसाळ यांनी सचिन रमेशराव करडे यांचे नाव सुचवले. या प्रस्तावाला रामेश्वर ढवळे, राहुल चक्रे आणि रवींद्र काजे यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सर्व ग्राम रोजगार सेवकांनी एकमताने सचिन रमेशराव करडे यांची अध्यक्षपदी निवड केली.यावेळी उपाध्यक्षपदी धीरज भाऊराव मिसाळ, सचिवपदी सचिन वाघाडे, सहसचिवपदी मंगेश खरीपकार, कोषाध्यक्षपदी ज्ञानेश्वर सानप तर प्रसिद्धी प्रमुखपदी नितीन ठाकरे यांची निवड करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून राहुल चक्रे, रवींद्र काजे, श्रीकृष्ण राऊत, राजूभाऊ मेश्राम, नाशिरखा पठाण, संदीप कदम, गोकुळ ढगे, रामेश्वर ढवळे, एकनाथ केंबल, विजय टेळे, शुभम जाधव, वैभव लवंगे, नारायण मारब्दे, सुनील आखरे, गजानन घरडे, संदीप राऊत, सचिन रिटे, योगेश राऊत, सुनील हुमणे, मोरेश्वर हांडे, सुरेश गजभिये, दीपक कडव, मुरलीधर हंबर्डे, बालिकाताई दांडगे, गजानन गाडेकर, सुधीर गंथळे, सुरज काकडे, हर्षल इंगळे, उमेश गावनर, शरद पवार, विनोद वानखडे आदींची निवड जाहीर करण्यात आली.नवीन अध्यक्षांचा तालुक्यातील विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित ग्राम रोजगार सेवकांनी नवीन कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.बैठकीचा समारोप एकजुटीचा संदेश देत करण्यात आला असून संघटना अधिक सक्षम व प्रभावी करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.
