पत्रमहर्षी बाळासाहेब मराठे सुवर्ण पदक व अण्णासाहेब देशमुख स्वर्ण पदकाने सन्मान
गुणवंत विद्यार्थिनीच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
Sant Gadge Baba Amravati University च्या ४२ व्या दीक्षांत समारंभात श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मास्टर ऑफ जर्नालिजम अॅण्ड मास कम्युनिकेशन विभागातील विद्यार्थीनी मयुरी गणपत बारी हिने दुहेरी सन्मान पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. तिला ‘पत्रमहर्षी बाळासाहेब मराठे सुवर्ण पदक’ तसेच ‘श्री. पी. के. उपाख्य अण्णासाहेब देशमुख अमरावती स्वर्ण पदक’ प्रदान करून गौरविण्यात आले.या भव्य समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश Bhushan Gavai प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच Mahatma Gandhi Universityचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, माजी प्र-कुलगुरू डॉ. व्ही. एस. जामोदे, डॉ. प्रसाद वाडेगावकर, माजी कुलसचिव डॉ. वंदन मोहोड, प्रा. सी. डी. देशमुख, डॉ. बी. आर. वाघमारे, डॉ. तुषार देशमुख, डॉ. श्वेता मिलिंद बारहाते, प्रा. स्वाती महेंद्र ढोरे, ओजस्विनी अविनाश असनारे तसेच एन.सी.सी. अधिकारी, शासकीय अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांचे सदस्य, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, शिक्षक, कर्मचारी, पाचही जिल्ह्यांतील गुणवंत विद्यार्थी, आचार्य पदवीधारक, महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांसह शहरातील अनेक गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मयुरी बारी हिने आपल्या यशाचे श्रेय प्राध्यापक, आई-वडील व भावंडांना दिले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
