प्रथम बक्षिस पालघर नाशिक तर द्वितीय बकासुर टीम नेर परसोपंत याना
सालोड (कसबा) / अंकुश निंमनेकर
५२-५५ वजन गटातील वजन ग्राउंड, सालोड (कसबा) येथे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.परिसरातील क्रीडाप्रेमी,युवक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.या स्पर्धेत प्रथम बक्षीस टीम पालघर (नाशिक) यांनी पटकावले, तर द्वितीय बक्षीस टीम बकासूर (नेर) यांनी मिळवले. प्रथम व द्वितीय बक्षीस रवीभाऊ मुंदे यांच्या तर्फे देण्यात आले. तृतीय बक्षीस रामराज्य क्रीडा मंडळ, सालोड यांनी जिंकले असून ते सतीश खोडे यांच्या तर्फे देण्यात आले. चतुर्थ बक्षीस टीम तुकड्यादास यांना अंकुश निमणेकर व चेतन राऊत यांच्या तर्फे प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मंगरुळ चव्हाळा येथील ठाणेदार संजय आत्राम, युवा ग्रामीण पत्रकार संघटना विभागीय अध्यक्ष उत्तमभाऊ ब्राम्हणवाडे तसेच गावकरी मंडळी यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.तसेच गावातील प्रमुख मान्यवरांमध्ये सरपंच जगदीश ढगे, प्रकाश वेळूकर, ऊकडराव नेवारे, अरुण वेळूकर, आरिफ भाई, अनिल ढोंमणे, चेतन राऊत, रामेश्वरम कांबळे, जुबेर भाई, शाकीर भाई, गणपत राऊत, तीर्थीदास ठाकरे, निलेश रीखे, कयुम भाई, चैतन्य रिखे व प्रविणभाऊ आदींची विशेष उपस्थिती होती.

या स्पर्धेचे आयोजन रामराज्य क्रीडा मंडळ, सालोड यांच्या वतीने अंकुश निमणेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. स्पर्धेत सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली. ग्रामीण भागातील युवकांना खेळासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आयोजक मंडळाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
