नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक २ ऑक्टोबर, २०२० राबविण्यास सुरवात झाली. “माझी वसुंधरा अभियान ५.०” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ जून, २०२४ ते दिनांक ३१ मार्च, २०२५ या कालावधीत राबविण्यात आले. माझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये राज्यातील ४२२ नागरी स्थानिक संस्था व २७,८९५ ग्राम पंचायती अशा एकूण २८,३१७ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धामध्ये नगरपंचायत नांदगाव खंडेश्वरनी सहभाग घेतला होता.व स्पर्धामध्ये असणाऱ्या प्रत्येक गुण मिळनाऱ्या विषयावर लक्ष केंद्रित करून गुण मिळालेच पाहिचे ही अपेक्षा व जिद्द बाळगुन मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांच्या मार्गदर्शना खाली नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर द्वारा तलाव सौंदर्यकरण, अनेक प्रजातीच्या वृक्ष लागवड, तसेच पृथ्वीवरून नष्ट होत असलेल्या वनसंपदेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमे तुन जनजागृती, भिंतीवर आकर्षक चित्रे, नांदगाव शहरातील विहिरींचे पुनर्जीवन तसेच विहिरींच्या बाहेरील भागावर आकर्षक माझी वसुंधरा दर्शक चित्रे, नांदगाव शहरात विविध ठिकाणी पंचतत्व दर्शक फलक, अनेक सार्वजनिक ठिकाणी पंचतत्व पाँईट लावण्यात आले,

शाळा महाविद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, नांदगाव शहरातील सरकारी व खाजगी मालमत्तेवर मोठ्या प्रमाणात रेन हार्वेस्टिंग, हवा, पाणी, ऊर्जा ऑडिट इत्यादी कामे पारदर्शकपणे पार पडली त्यामुळे अमरावती विभागातून नगरपंचायत नांदगाव खंडेश्वर प्रथम क्रमांक प्राप्त करण्याचे मानकरी ठरले याकरिता माननीय मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांचा प्रथम क्रमांक प्राप्त करण्या करिता मोला चे मार्गदर्शन आणि सिंहाचा वाटा आहे आणि प्रत्येक कामाबाबत उस्फुर्त प्रतिसाद महत्त्वाचे आहे या बक्षीसकरिता प्रितम सोनटक्के स्वच्छता निरीक्षक, नेमिनाथ सानप शहर समन्वयक, परिवल देशमुख पा.पु इंजिनियर, अशोक चिंडाले मुकादम आणि न.प अधिकारी कर्मचारी व कंटात्री स्वच्छता सुपरवायझर प्रतिक सिरसाट स्वच्छता कर्मचारी यांचे अथक परिश्रम आहे. प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल नांदगाव शहरात सर्वत्र कौतुकास्पद चर्चा केली जात आहे. प्रथम क्रमांक प्राप्त पारितोषिक सन्मानचिन्ह व बक्षीस रक्कम ७५,००००, (पंच्याहत्तर लक्ष) अनुज्ञय असणार आहे योगदान देणारे नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी वृंद आणि समस्त नांदगाव खंडेश्वर नगरवासिंयांचे अभिनंदन आणि आभार!
