पथ्रोट,/ नितीन दुर्बुडे
येथील न्यू आर्य समाजाच्या वतीने भुलेश्वर संस्थान येथील शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त शतकुंडीय गायत्री महायज्ञ भक्तिभावात संपन्न झाला. आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांना शिवमंदिरात बोध झाल्याच्या स्मरणार्थ हा बोधोत्सव दरवर्षी महाशिवरात्रिला साजरा केला जातो.या महायज्ञाला सत्यवीर शास्त्री (प्रधान, आर्य प्रतिनिधी सभा विदर्भ छत्तीसगड, नागपूर) आणि धर्माचार्य पं. कृष्णकुमार शास्त्री (आर्य समाज, हंसापुरी) यांची प्रमुख

उपस्थिती लाभली. वैदिक मंत्रोच्चार, हवन आणि सामूहिक प्रार्थनेतून वातावरण अध्यात्मिक झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शरद कोसरे, नितीन दुर्बडे,नामदेवराव सोयाम, विजय तिडके, नरेश कोसरे, रमेश नागोसे आणि अरविंद काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. महायज्ञामुळे परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
