नगर पंचायत मुख्याधिकारी यांचे सर्व विभागाना आदेश
नगरसेविका सौ प्रांजली राहुल गुल्हाने यांच्या पत्राची दाखल
नांदगाव खंडेश्वर ( तालुका प्रतिनिधी )
नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत प्रशासनातील कामकाजात अधिक स्पष्टता आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे आदेश केवळ तोंडी न देता ते ‘लेखी’ स्वरूपातच द्यावेत, अशा शासन अधिसूचनेची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नगरसेविका प्रांजली राहुल गुल्हाने यांच्या पत्राची दखल
नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांनी पत्राद्वारे (जा. क्र. २५/२०२६) या गंभीर विषयाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. नगरपंचायतच्या दैनंदिन कामकाजात अनेकदा तोंडी आदेशांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण होतो. जबाबदारी निश्चित करण्यात अडचणी येतात आणि याचा थेट परिणाम प्रशासकीय पारदर्शकतेवर होतो, असे त्यांनी पत्रात नमूद केले होते.
प्रशासनाकडून स्पष्ट सूचना
या पत्राची दखल घेत, प्रशासकीय स्तरावरून आता सर्व विभागांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. शासन निर्णयानुसार, यापुढे सर्व महत्त्वाच्या कामांबाबत वरिष्ठांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना केवळ लेखी स्वरूपातच आदेश द्यावेत. यामुळे कामातील संदिग्धता दूर होऊन शासकीय कामाला गती मिळेल आणि प्रशासकीय शिस्त अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, नगरसेविका सौ. प्रांजली गुल्हाने यांनी केलेल्या या पाठपुराव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
