प्रत्यक्ष औद्योगिक जगाची ओळख करून देण्याचा उपक्रम
धामणगाव रेल्वे /तालुका प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञान पुरेसे नसून, प्रत्यक्ष औद्योगिक व संशोधन क्षेत्राची ओळख होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या उद्देशाने व्हर्टेक्स ट्युशन क्लासेस तर्फे विद्यार्थ्यांचा मोफत शैक्षणिक दौरा दिनांक 9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान IIT भुवनेश्वर येथे आयोजित करण्यात आला.या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रयोगशाळा तसेच विविध संशोधन केंद्रांना भेट दिली. त्यांनी तेथील प्राध्यापक, तज्ञ आणि रिसर्च स्कॉलर्स यांच्याशी संवाद साधून अत्याधुनिक संशोधन तंत्रज्ञानाची माहिती घेतली. तसेच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, लेक्चर हॉल आणि कॅम्पसमधील इतर शैक्षणिक सुविधा पाहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी अनुभव मिळाला.

या दौऱ्याचे मार्गदर्शन व्हर्टेक्स ट्युशन क्लासेसच्या संचालिका सौ. नुतन ऋषिकेश शाहाकर (ठाकरे) यांनी केले. त्या म्हणाल्या, “विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञान देणे नव्हे, तर त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी देणे अधिक आवश्यक आहे. यामुळे त्यांच्या करिअरची दिशा अधिक दृढ होते.”या शैक्षणिक दौऱ्यात पियुष चौधरी, अमन आकडे, शार्दुल राऊत, दिप्ती राऊत, रिंकल मनकानी, रुदयी भुतडा, मृणाल घुगे, श्रुती उके, मोहिणी देशमुख, परी ठाकरे, करुणा गावडे, मेघा वासनिक, श्रावणी हांडे, रुचिता पारधी आणि स्वरश्री पडाडे या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष औद्योगिक जगाची व्यावहारिक ओळख झाली असून, भविष्यातील करिअर घडविण्यासाठी हा दौरा अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
