अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
दि. 15.10.2025 रोजी ता. बदनापूर येथे भारत हेवी इलेक्ट्रीकल लिमिटेड यांचे अर्थसह्याने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मा. श्री. रमेश मावसकर स्वतंत्र संचालक यांचे शुभहस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा यशवंत काळे विधानसभा आयोजक भाजयुमो श्री एकल विद्यालय अभियान आरोग्य समिती अध्यक्ष सौ रेखाताई रमेश मावसकर, समीरजी हावरे भाजपा मेळघाट तालुका अध्यक्ष,अश्वमेध संस्था चे प्रकल्प संचालक विकिजी पांडे, हिराबाई बेलसरे सरपंच बदनापूर जयसिंगजी गायन किसान आघाडी भाजपा चिखलदरा संजुभय्या चाकुर तसेच बदनापूर येथील गणमान्य नागरीक व डॉक्टर गण डॉ.श्वेता मिश्रा, डॉ सत्यजित पाटिल तसेच स्वस्थ भारत अभियान संपूर्ण-चमू यांनी विशेष परिश्रम घेऊन शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यात आले.

-या आरोग्य शिबिरा मध्ये संपूर्ण गावातील लोकांची मोफत तपासणी करण्यात आली या शिबिरा मध्ये नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन, शुगर, बी. पी. पांढऱ्या पेशी, लाल पेशी, किडणी,लिव्हर, इत्यादि प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच गरजुवंताना मोफत चष्माचे वाटप करण्यात आले. उपस्थित सर्व गावकऱ्यांची तपासणी करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.
