प्रतीकात्मक ३७व्या जनआंदोलनाची तयारी सुरु, दिवाळीच्या पूर्वसंध्येला रेल्वे स्टेशन परिसर उजळणार शेकडो दिव्यांनी
अचलपूर/ फिरोज खान
अचलपूर शहरातील शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीची ३७ वी आढावा बैठक आज साक्षी इन्फोटेक येथे उत्साहात पार पडली. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेज रूपांतर प्रकल्पाचा डीपीआर (Detailed Project Report) प्रत्यक्ष कार्यान्वित टप्प्यात पोहोचल्याने सर्व सत्याग्रहींमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते.बैठकीदरम्यान उपस्थित सत्याग्रहींनी “शकुंतला झुक झुक गाडी लवकरच एक्सप्रेस होईल!” या संयुक्त घोषवाक्यासह आगामी लढ्याची दिशा निश्चित केली. समिती सदस्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत शकुंतला रेल्वेचे काम प्रत्यक्ष सुरु होत नाही, तोपर्यंत सत्याग्रहाची लढाई सुरूच राहणार आहे.या बैठकीत ३७व्या टप्प्यातील जनआंदोलनाचे आयोजन, नियोजन आणि त्याची दिशा ठरविण्यात आली. समितीने यावेळी सामाजिक उपक्रमांमधून प्रतीकात्मक आणि अहिंसक आंदोलन राबविण्याचा निर्णय घेतला आहे.दिवाळीच्या पूर्वसंध्येला २० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता, सर्व सत्याग्रही रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान राबवतील.

या उपक्रमात स्टेशन परिसरातील नागरिकांनाही सहभागी करून घेतले जाणार असून, त्यानंतर दिवाळी फराळ वाटप आणि चिमुकल्या मुलांसोबत आतिषबाजी करण्यात येईल.संध्याकाळी ६ वाजता रेल्वे स्टेशन परिसर शेकडो आशेच्या दिव्यांनी उजळणार असून, हा अनोखा सोहळा “आशेचा दीपोत्सव” म्हणून साजरा करण्यात येईल. शकुंतला रेल्वेच्या पुनरुज्जीवनासाठी स्थानिक पातळीवर जनभावना आणि बांधिलकी प्रदर्शित करण्याचा हेतू या कार्यक्रमामागे आहे.बैठकीला शहरातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच सत्याग्रही योगेश खानजोड़े, डॉ. राजा धर्माधिकारी, राजेश अग्रवाल, दीपा तायडे, राजकुमार बरडिया, संजय डोंगरे, शंकर बारखडे, प्यारेलाल प्रजापती, राजेंद्र जयसवाल, पंकज गुप्ता, राजेश पांडे, दयाराम चंदेले, उज्ज्वला माकोडे, मुरलीधर ठाकरे, कवि उज्ज्वल अग्रवाल आणि आकाश श्रीवास्तव हे प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमाचे समारोप करताना योगेश खानजोड़े, डॉ. धर्माधिकारी, दीपा तायडे, राजकुमार बरडिया आणि राजेंद्र जयसवाल यांनी नागरिकांना दिवाळीच्या या विशेष उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा शकुंतला रेल्वेबद्दल नवचैतन्य निर्माण झाले असून, हा आंदोलनाचा ३७वा टप्पा “संघर्षातून विकासाचा दीप उजळणारा” ठरणार असल्याचे सर्वांचे मत आहे.

https://t.me/Top_BestCasino/125