किसान मोर्चा अमरावती शहर जिल्हा कार्यकारणी बैठक.
अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनात मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन नागपूर येथे होणाऱ्या 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान ऍग्रो व्हिजन कार्यशाळा राष्ट्रीय कृषी प्रदर्शन व परिसंवाद याबाबत
जनजागृती साठी किसान मोर्चा अमरावती शहर जिल्ह्या अध्यक्ष मिलिंद बांबल यांनी भाजपा कार्यालय राजापेठ येथे बैठकीचे आयोजन केले होते नितीन कुळकर्णी ( नामदार नितीनजी गडकरी यांचे स्वीय सहायक) यांच्या प्रमुख उपस्थितीत राजापेठ भाजपा कार्यालय येथे झालेल्या बैठकीला भाजपा शहर जिल्हाध्यक्ष नितीन धांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब वानखडे, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस ललित समदूरकर , किसान मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबल , भोयर , सहकार नेते गंगाधर मालठाणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकी मध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या नागपूर येथील ऍग्रो व्हिजन पश्चिम भारतातील सर्वात मोठी कृषी प्रदर्शन यामध्ये शेतकऱ्यांना शेती सोबतच जोडधंदा करून उत्पन्न कसे वाढवावे याबाबत सुद्धा मार्गदर्शन करतात शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच शेती सोबतच जोडधंदा करून शेतीचे उत्पादन कसे वाढवावे त्याचप्रमाणे शेतमालाला योग्य भाव कसा मिळेल या दृष्टीने सर्व मार्गदर्शन या तीन दिवसीय शिबिरामध्ये केली जाते नागपूर येथे होणाऱ्या 21 ते 24 नोव्हेंबर ॲग्रोव्हिजन कार्यक्रमाला सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा.

असे आवाहन सुद्धा करण्यात आले किसान मोर्चा अमरावती शहर जिल्हा सरचिटणीस राजेश गोफणे , नंदलाल मोहोकार, अविनाश मालोदे ,राजेश पोहनकर, उज्वल अंबाडे ,दीपक बांबल विनोद बाभुळकर, रामेश्वर रावरासे ,नीरज खेरडे , रोशन उमक, आकाश देशमुख, जुगलकिशोर टावरी, लक्ष्मणराव थेटे, यश नाईक, मनोज भोजने , शभम बांबल ,अंकुश रोडे, नरसिंग बंग , प्रफुल्ल सावला ,राहुल धर्माळे , प्रमोद कुरोटिया, गजानन गतफने ,अतुल तिरथकर, विकास देशमुख ,हरीश नाईक, अभी इंगळे, प्रज्वल मेश्राम,चिन्मय मेटांगे, यश नाईक,मनोज जावरकर, ऋतिक ओडे ,दीपक अनासने आदी मान्यवर उपस्थित होते.
