आ.अडसड यांच्या प्रयत्नातून आणखी ५ नवीन बस नागरिकांच्या सेवेत दाखल
चांदूर रेल्वे एसटी आगारात बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न
चांदूर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
चांदूर रेल्वे येथे लवकरच प्रशस्त सर्व सुविधायुक्त बसस्थानक उभारले जाणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रताप अडसड यांनी केले. ते चांदूर रेल्वे एसटी आगारात 5 नवीन बसेसच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.चांदूर रेल्वे बसस्थानकावर दाखल झालेल्या ५ नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा सोमवारी (ता. 6) आमदार प्रताप अडसड यांच्या हस्ते संपन्न झाला. याआधी सुध्दा चांदूर रेल्वे आगारात 5 बसेस मिळाल्या आहे. आजही ग्रामीण भागातील बहुतांशी प्रवाशी ये-जा करण्यासाठी वाहतूकीचे प्रभावी साधन म्हणून लालपरी बसला प्राधान्य देतात.

म्हणूनच आपल्या मतदारसंघातील नागरिकांसाठी नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात याकरीता परिवहन मंत्र्यांकडे आमदार प्रताप अडसड यांनी सातत्याने पाठपुरावा करून अतिरिक्त पाच वाढीव बसची मागणी केली असता या पाठपुराव्याला यश आले आहे. अतिरिक्त नवीन ५ बसेस चांदूर रेल्वे आगारात उपलब्ध झाल्या आहे. यामुळे मतदारसंघातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी बळकट होण्यास मदत होणार आहे.या लोकार्पण सोहळ्याला भाजपा शहराध्यक्ष नंदा वाधवानी, तालुकाध्यक्ष विवेक चौधरी, जिल्हा टूरीजम सेल जिल्हाध्यक्ष पप्पू भालेराव,बबन गावंडे, रवींद्र उपाध्ये, नरेश वाडकर, सुधाकर धामणकर, बच्चू वानरे, डॉ. सुषमा खंडार, गजानन जुनघरे, छोटू देशमुख, अजय हजारे, राजू चौधरी, प्रशांत देशमुख, प्रशांत भेंडे, प्राविण्य देशमुख, अमोल देशमुख, संजय पुनसे, सविता ठाकरे, सौ. पाठक, विजय मिसाळ, शाम रामटेके, समिर भेंडे, जहीर काझी, जगदिश होले, गोपाल बकाले, अक्षय जामदार, आगार व्यवस्थापक जयंत झाडे, कर्मचारी श्याम जगताप, प्रवीण घाटे, मनोहर वगारे, उमेश नवरंगे, योगेश ठाकरे, प्रतिभा महाजन, वैष्णवी पाटील, विशाल कांबळे, अर्जुन बाबर, प्रमोद खवड, राजू बांते यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, भाजपा कार्यकर्ते व प्रवासी उपस्थित होते. आगामी काळात चांदूर रेल्वेकरांना नव्या बसस्थानकाच्या रूपाने आणखी एक महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध होणार असल्याने शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
