नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
स्थानिक नांदगाव खंडेश्वर येथे “श्री. खंडेश्वर कर्मचारी सहकारी पतसंस्थे”ची सर्वसाधारण सभा सर्व संचालक व सभासद यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या सभेचे अध्यक्ष म्हणून पतसंस्थेचे अध्यक्ष -श्री.अजयसिंह बिसेन होते तर प्रमुख उपस्थिती संस्थेचे सचिव -श्री. अमोल ठाकरे, उपाध्यक्ष- श्री. संजय तामसकर, संचालक -श्री जगदीश गोवर्धन, श्री. विनय काळे, श्री. विनोद पाटेकर उपस्थित होते. तसेच,प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थापकीय अध्यक्ष- श्री. शरदजी आढाउ व माजी अध्यक्ष- श्री. प्रमोद गावंडे, माजी सचिव- श्री. प्रदीप ठाकरे उपस्थित होते. सर्वप्रथम भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सचिव -श्री. अमोल ठाकरे यांनी अहवाल वाचन केले व पतसंस्थेचे अध्यक्ष -श्री. अजयसिंह बिसेन यांनी संस्थेची भरभराट व “अ”श्रेणीमध्ये संस्थेची वाटचाल व प्रगती आणि सभासदाचे भाग भांडवल बाबत सुरक्षितता याची हमी दिली. सभेमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये श्री.जयंत पुसदकर,श्री. दिलीप पुनसे, श्री. राजेंद्र मांडवे यांचा सत्कार करण्यात आला संचालन श्री. जगदीश गोवर्धन यांनी केले आभार श्री. विनोद पाटेकर यांनी मानले.
