महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्यासारखे महान व्यक्तिमत्व होणे नाही.मुख्याध्यापक प्रदीप ठाकरे
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
स्थानिक नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते सर्वप्रथम दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक- प्रदीप ठाकरे होते तर प्रमुख उपस्थिती पर्यवेक्षक- राजेश देशमुख होते या प्रसंगी महात्मा गांधींचे लोकप्रिय गीत सादर करण्यात आले व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नमिता कराळे यांनी केले आभार जगदीश गोवर्धन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले.
