विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी अमरावती, संचालित टायटन्स पब्लिक स्कूल बडनेराचा उपक्रम
बडनेरा /प्रतिनिधी
३७ वी राज्यस्तरीय कीक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा १९ ते २१ सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये पुणे बालेवाडी स्टेडियम पुणे येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेमध्ये अमरावती जिल्ह्याच्या टीम कडून ‘टायटन्स पब्लिक स्कूल ‘ च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि आपल्या कलेचे शानदार प्रदर्शन करून विजय प्राप्त केला विजयी ठरलेले खेळाडू : तनिष आंबेडकर , पूर्वेश धांडे , गोल्ड मेडल प्राप्त केले . आजम शेख, अर्णव चारवेकर, जियान खान, तसेच मुली ईशानी दारोकार, पलक भाकरे, अदिती शिंगाने, यांनी सिल्वर मेडल प्राप्त केले. तसेच ईश्वरी पोकळे, अन्वी कुलसंगे, कलश श्रीवास, तसेच स्वराज हिरोड, रणधीर श्रीवास्तव , प्रिन्स जैन. ब्रांच मेडल प्राप्त केले .पॉईंट फाईट व लाईट कॉन्टॅक्ट चे प्रदर्शन केले. या चौदा विद्यार्थ्यांनी आपल्या यशस्वीतेचे श्रेय ‘टायटन्स पब्लिक स्कूल’ चे प्राचार्य माननीय अजय चोबे सर, निलेश फुलंबरकर सर, जफर खान सर व आई वडील यांना दिले.विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटी अमरावती चे अध्यक्ष मा. डॉ नितीनजी धांडे, उपाध्यक्ष मा. अॅड. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष मा. प्रा. (डॉ.) हेमंतजी देशमुख, सचिव मा. श्री. युवराजसिंगजी चौधरी , संचालक मंडळातील कार्यकारी सदस्य मा. शंकररावजी काळे, मा. श्री. नितीनजी हिवसे, मा. सौ. रागिणीताई देशमुख, मा. डॉ. सौ. वैशालीताई धांडे, मा. डॉ. सौ. पुनमताई चौधरी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
