शिरपुर येथिल युवकांचा शिवसेनेत प्रवेश
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नवनियुक्त शिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख आशिष धर्माळे यांची नियुक्ती धामणगाव विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुख पदी झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन आज दिनांक 29/ 9- 2025 सोमवारी दुपारी 2 वाजता शासकीय विश्राम भवन नांदगाव खंडेश्वर येथे करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे सहाय्यक संपर्कप्रमुख श्याम देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील केणे वैद्यकिय सेल च्या जिल्हाप्रमुख सौ मायाताई देशमुख उपस्थित होती
,
या कार्यक्रमांमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख आशिष धर्माळे यांचा नांदगाव खंडेश्वर तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने बाळासाहेबांची प्रतिमा तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आल याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक ग्रामीण भागातील लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या सोडवायच्या आहे व गाव तिथे शाखा शिवसेनेची असली पाहिजे अति पावसामुळे तालुक्यामधील ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतील त्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे सुद्धा या ठिकाणी अशीष धर्माळे यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये शिवसैनिकांचा मोठा गड आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या मदतीला धावून जाण्याचे आव्हान सुद्धा शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना याप्रसंगी केले या समारंभाला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या भव्य दिव्य सत्कार समारंभाला उपस्थिती लावली होती याप्रसंगी अनेक शिवसैनिकांना शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला याप्रसंगी त्यांचे स्वागत सुद्धा करण्यात आले याप्रसंगी या बैठकीला शिवसेनेचे सहाय्यक संपर्कप्रमुख श्याम देशमुख शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख आशिष धर्माळे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील केने शिवसेनेचे धामणगाव विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र पाटील लेंडे नांदगाव खंडेश्वर तालुका शिवसेनेचे नेते प्रशांत वैद्य , शिवसेनेचे नेते श्री विलास धांडे शिवसेना नांदगाव खंडेश्वर तालुकाप्रमुख पवन पाटील ठाकरे उप तालुकाप्रमुख मनोज जैन उपतालुकाप्रमुख अमोल शिरभाते ,शहर प्रमुख शैलेश पिंजरकर युवा सेना तालुकाप्रमुख विवेक भगत रघुनाथ निंभोरकर सागर टेळे वैद्यकीय सेलच्या जिल्हाप्रमुख माया देशमुख महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सोनाली टेकाळे सातरगाव येथील काकडे उपस्थित होते शिरपुर येथिल रमेश कदम,पवन कदम, तेजस केसरखाने ,सागर रुपवने यांनी शिवसेत प्रवेश केला,
