नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा माहुली चोर येथे शिक्षक परिषदेचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्यात आले.शाळेमध्ये शिक्षण परिषदेचे आयोजन केंद्रप्रमुख विलास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले.

या परिषदेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विपिन काकडे , गावचे सरपंच संगीता झंझाट,गावचे उपसरपंच राजेंद्र सरोदे , उपस्थित होते . परिषदेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध स्वरूपाचे ऍक्टिव्हिटीजचे सादरीकरण सर्वांसमोर केले. कार्यक्रमाचे संचलन शाळेच्या विद्यार्थिनी कोमल गाढबैल व जान्हवी भोसले या विद्यार्थ्यांनी केले.या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील मुख्याध्यापिका श्रीखंडे,शाळेतील शिक्षक रविकांत भिसे,शिक्षिका अर्चना जाधव,सुनील मोपारी. प्रीती दाते यांनी केले.कार्यक्रमाचे आभार समृद्धी खारोडे या शाळेच्या विद्यार्थिनीने केले.
