नागरिक बेघर; शासनाकडे मदतीची मागणी
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेणी गणेशपूर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे अनेक घरांच्या भिंती कोसळून पडल्या असून काही कुटुंब बेघर झाले आहेत. घरांची भिंती ढासळल्याने घरांचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे. त्यामुळे या कुटुंबांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.या अनुषंगाने नुकसानग्रस्त नागरिक विनोद मधुकरराव जोगे,गजानन बापूराव रंगाळे,जयप्रकाश राजाराम खंडारे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, अतोनात नुकसान झाल्यामुळे राहण्याकरिता छप्परसुद्धा उरलेले नाही. सध्या नागरिकांची राहण्याची सोय वाचली नसल्याने शासनाने तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत व पुनर्वसनाची सोय करून द्यावी.

गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, सतत कोसळणारा पाऊस आणि घरांचे नुकसान यामुळे लोक हवालदिल झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने तात्काळ यावर लक्ष घालून मदतकार्य सुरू करावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
