नागपूर सुधार प्रन्यास (NIT) आणि नागपूर महानगर विकास प्राधिकरण (NMRDA) यांच्या संबंधी महत्वपूर्ण बैठक
पालकमंत्री बावनकुळे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती
नागपूर/जिल्हा प्रतिनिधी
नागपूर शहराच्या विकासाकरिता पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे अध्यक्षतेखाली सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत नागपूरकरांच्या आयुष्याशी थेट संबंध असलेल्या प्रश्नांवर ठोस चर्चा झाली घरकुल, रस्ते, नकाशे मंजुरी, जलनिस्सारण आणि इतर पायाभूत सुविधा पुरविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी आमदार नितेश राऊत नागपूरकरांच्यावतीने काही तातडीचे मुद्दे ठामपणे मांडले त्यामध्ये 1️⃣ गुंठेवारी प्रकरणे – प्रलंबित फाईल्स, रजिस्ट्रीतील अडथळे व डिमांड प्रक्रियेतील अडचणी त्वरित सोडवण्याची मागणी.2️⃣ स्मार्ट सिटी आरक्षण – मंजूर लेआउटमध्ये निर्माण झालेल्या अडचणींवर स्पष्ट उपाययोजना.3️⃣ नियमितीकरण प्रक्रिया – गुंठेवारी प्रकरणे फक्त ₹3000 मध्ये नियमित करण्याची अंमलबजावणी.

4️⃣ शासन निर्णय 2015 – भूसंपादित जमिनीवरील थकित भूखंडांचे नियमितीकरण.5️⃣ घरकुल व सुविधा – पूर्ण झालेले बांधकाम, प्रलंबित लिलाव, तसेच मैदानाचा विकास यावर ठोस निर्णय.या बैठकीतून नागपूरच्या विकासासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा आहे. नागपूरचा विकास ‘जनतेसाठी आणि जनतेसोबत’ व्हावा, यावर आमचा ठाम आग्रह आहे.
