चांदुरबाजार /एजाज खान
चांदूरबाजार येथील गो. सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी प्रोफेसर डॉ. नंदकिशोर गव्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रोफेसर डॉ. नंदकिशोर गव्हाळे रसायनशास्त्र विषयाचे अध्यापक म्हणून महाविद्यालयात गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत तसेच त्यांनी आयक्यूएसी कॉर्डिनेटर म्हणूनही उत्कृष्ट कामगिरी बजावलेली असून त्यांच्याच कारकिर्दीत महाविद्यालयाला अ दर्जा मिळालेला आहे तसेच महाविद्यालयाच्या विविध प्रशासकीय समितीचे त्यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिलेले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ आणि यशस्वी अनुभवाचा संस्थेच्या प्रगती करिता लाभ व्हावा या हेतूने संस्थेचे अध्यक्ष भास्करदादा टोम्पे, संस्थेचे सचिव डॉ. विजय टोम्पे, व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांच्याकडून डॉ. नंदकिशोर गव्हाळे यांची महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भास्करदादा टोम्पे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व नियुक्तीपत्र देऊन डॉ. नंदकिशोर गव्हाळे यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या . यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
