अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत क्रीडा उपसंचालनालय अमरावती तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी वाशीम कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेचे आयोजन वाशीम जिल्हा क्रीडागणात २३ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते.या सॉफ्ट टेनिस स्पर्धेत अमरावती येथील शिवाजी शिक्षण संस्था संचालित शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या ११ व्या वर्गातील विद्यार्थी वेदांत रवींद्र दांडगे याने १७ वर्षे वयोगटात द्वितीय स्थान प्राप्त केले.या विजयामुळे त्याची निवड राज्यस्तरावर झाली असून राज्यस्तरीय स्पर्धा पुढील आठवड्यात बालेवाडी बारामती पुणे येथे संपन्न होणार आहे.वेदांत दांडगे च्या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. कोरपे सर, सॉफ्ट टेनिस असोसियेशनचे सचिव नितीन पोटे सर, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक प्रा. जाधव सर, श्रीकांत यावले सर आदींनी अभिनंदन केले आहे.
