अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
अमरावती येथील धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठाण अमरावतीच्या वतीने गरबा नृत्य स्पर्धा दि.२५ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता सखा मंगलम्, यशोदानगर अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे.सदर प्रतिष्ठाणच्या वतीने दरवर्षी जागर जिजाऊ सविञी कार्यक्रमांतर्गत गरबा नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेमध्ये हजारो रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहे तसेच हि स्पर्धा सर्वांसाठी खुली असून सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. या गरबा नृत्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मंजू ठाकरे, आरती बोंदरकर, पुजा रडके व धनश्री सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठाणच्या पदाधिकारींनी केले आहे.
