अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
ग्रामीण भागातील शेकडो बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात नाह त्रास सहन करावा लागत असल्याने तालुका निहाय साहित्य वाटप करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे मा.जिल्हा सचिव दिनकर सुंदरकर यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे केली आहे.जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना पेटी व भांडे किट साहित्य देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र हे साहित्य वितरण करताना मोठ्या अडचणी दिसून येत आहे शेकडो लाभार्थ्यांना रात्रीच येऊन वितरण स्थळी मुक्काम करावे लागते तर जिल्ह्यातून खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार महिला पुरुष यांना लहान मुलांना सोडून किंवा सोबत घेऊन वितरण स्थळी उपस्थित राहावे लागत आहे मात्र त्यांना या साहित्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे करिता तालुकास्तरावर वितरण व्यवस्था उपलब्ध करून द्यावी जेणेकरून गोरगरीब सामान्य जनतेला नाहक त्रास होणार नाही अशी मागणी दिनकर सुंदरकर यांनी मेल द्वारा कामगार मंत्री यांच्याकडे केली आहे.
